मुन्नाभाई MBBS स्टाईलने डॉक्टर बनला अन् वादात सापडला, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Last Updated:

डॉक्टर आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक (एसीपी) असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या "मुन्नाभाई"ला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बेकायदेशीरपणे नर्सिंग होम चालवत होता.

Navi Mumbai Police Bharati
Navi Mumbai Police Bharati
डॉक्टर आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक (एसीपी) असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या "मुन्नाभाई"ला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बेकायदेशीरपणे नर्सिंग होम चालवत होता. त्याने बनावट शैक्षणिक ट्रस्ट सुद्धा सुरू केली होती. त्या माध्यमातून आरोपीने अनेक विद्यार्थ्यांना मेडिकल डिप्लोमाची पदवी उघडपणे विकल्या. खांदेश्वर पोलिसांनी आरोपी राजेंद्र सोपान निकम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीन जेजे स्कूल ऑफ आर्टमधून आर्ट टिचरचा डिप्लोमा केला आहे. तो एक कला शिक्षक असूनही, निकमच्या गाडीवर बनावट क्रमांकाची प्लेट होती. ही गाडी उत्तर प्रदेशातील गोपीगंज (भदोही) येथे दाखल झालेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्याशी जोडली गेली होती. निकम यांनी शिवम एज्युकेशनल ट्रस्ट (डीम्ड युनिव्हर्सिटी, Deemed University) नावाची संस्था स्थापन केली. कोणत्याही अधिकाराशिवाय, त्यांनी मेडिकल लेब्रोटरी टेक्नोलॉजी नावाच्या संस्थेचं बनावट प्रमाणपत्रे वाटून तरुणांना फसवले.
advertisement
पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल फोन, रोख रक्कम, बनावट लायसन्स प्लेट असलेली कार आणि एअरगन जप्त केली. तसेच शिवम एज्युकेशनल ट्रस्टने 2016 ते 2025 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेले बनावट मार्कशीट आणि प्रमाणपत्रे, प्रवेश अर्ज, बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आरोपीच्या नावाने ड्रायव्हिंग लायसन्सच्या फोटो कॉपी जप्त केल्या. शुभम हॉस्पिटलचे लेटरहेड आणि आयसीयू सील करून जप्त करण्यात आले.
advertisement
मानखुर्दमधील नर्सिंग होम, वैद्यकीय पदवीशिवाय, आरोपीने मुंबईतील मानखुर्दमध्ये शुभम हॉस्पिटल आणि आयसीयू नावाचे एक नर्सिंग होम उघडले होते. जिथे तो रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करत असे. लोकांना प्रभावित करण्यासाठी, तो त्याच्या मोबाईल फोनवर पोलिसांच्या गणवेशातील स्वतःचे फोटो ठेवत असे आणि त्याच्या कागदपत्रांवर "एसीपी डॉक्टर राज निकम" असे लिहिले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुन्नाभाई MBBS स्टाईलने डॉक्टर बनला अन् वादात सापडला, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement