दत्तजयंतीच्या महाप्रसादातून गडहिंग्लजमध्ये १५० ते २०० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा

Last Updated:

Kolhapur News: दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादामधून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

कोल्हापूर विषबाधा
कोल्हापूर विषबाधा
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये दीडशे ते दोनशे लोकांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत.
गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावातील ही घटना आहे. दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादामधून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गुरुवारी दत्त जयंतीच्या सोहळ्यात गावातील नागरिकांनी महाप्रसाद खाल्ला होता. त्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला.
गावातील जवळपास दीडशे ते दोनशे जणांना उलट्या, पोटात मळमळ, जुलाबाचा त्रास सुरू झाला. रुग्णालयात गेल्यानंतर विषबाधा झाल्याची माहिती समोर आली. रुग्णांवर गडहिंग्लजमधील नेसरी ग्रामीण रुग्णालयात आणि गडहिंग्लजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे.
advertisement

आरोग्य यंत्रणेची तारांबळ

जवळपास दीडशे ते दोनशे नागरिकांना एकाच वेळी विषबाधा झाल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. खाटांची संख्या कमी पडल्याने रुग्णांवर जमिनीवरच उपचार करण्याची वेळ ओढावली. बाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दत्तजयंतीच्या महाप्रसादातून गडहिंग्लजमध्ये १५० ते २०० पेक्षा जास्त लोकांना विषबाधा
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement