Wild Animals : चित्ता, बिबट्या आणि जॅग्वारमध्ये काय फरक? 'या' 3 सोप्या ट्रिकने लगेच ओळखा प्राणी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तिघेही पिवळसर रंगाचे आहेत आणि त्यांच्या अंगावर काळे ठिपके असतात. यामुळेच अनेकजण त्यांना एकच समजतात, ज्यामुळे त्यांना ओळखताना अनेकांचा गोंधळ होतो. पण ही तिन्ही जंगली प्राणी एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत. त्यांची गती, बुद्धिमत्ता आणि क्रूरता तिन्ही ही वेगवेगळे आहेत.
advertisement
advertisement
advertisement
चित्ता (Cheetah) :चित्ता हा जमिनीवरील सर्वात जलद धावणारा प्राणी आहे. हा प्राणी अवघ्या 3 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास वेगाने धावू शकतो. शरीर हलके, कंबर पातळ आणि पाय लांब असतात. याची लांब शेपटी धावताना संतुलन राखण्यास मदत करते. हलका पिवळा रंग आणि त्यावर छोटे, गोल, काळे ठिपके असतात. जणू त्यावर काळी मिरी पसरली आहे. ठिपक्यांमध्ये कोणतीही रिकामी जागा नसते.
advertisement
advertisement
बिबट्या (Leopard):जंगलातील सर्वात चालाक शिकारी हा बिबट्या (तेंदुआ) आहे, तो चित्त्यापेक्षा अधिक ताकदवान आणि जंगलातील अत्यंत चालाक शिकारी मानला जातो. हा प्राणी रात्रभर शिकार करतो आणि आपल्या शिकारीला इतर प्राण्यांपासून वाचवण्यासाठी झाडांवर लटकवून ठेवतो. याचं चित्त्यापेक्षा अधिक मजबूत शरीर आहे, तर सोनेरी पिवळ्या रंगावर गोल-गोल 'गुच्छ्यांसारखे' ठिपके (Roseats) असतात. या 'रोजेट्स'च्या आतली जागा रिकामी (Blanks/Hollow) असते, मध्ये कोणताही काळा ठिपका नसतो. बिबट्या उत्तम जलतरणपटू (Swimmer) आहे त्यामुळे तो पाण्यात पोहू शकतो, तसंच तो झाडांवर सहज चढतो. हा आफ्रिकेपासून भारतापर्यंत (जंगल, डोंगर, गवताळ प्रदेश) राहू शकतो.
advertisement
जॅग्वार (Jaguar):जॅग्वार हा सर्वात ताकदवान बिग कॅटजग्वार हा बिबट्या आणि चित्ता दोघांपेक्षाही अधिक मजबूत, वजनदार आणि शक्तिशाली असतो. याचा जबडा इतका ताकदवान असतो की तो कासवाचे कवच सुद्धा सहज फोडू शकतो आणि थेट कवटीत चावा घेऊन शिकार करतो. त्याचे डोके मोठे असते. याचे 'रोजेट्स' (गुच्छ्यांसारखे ठिपके) बिबट्यासारखेच दिसतात, पण सर्वात सोपी खूण म्हणजे या 'रोजेट्स'च्या आत एक किंवा दोन छोटे काळे ठिपके (Dots) नक्कीच असतात.
advertisement
advertisement


