दरम्यान त्यानंतर दुसऱ्या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरून रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी रोहित पवार यांच्या भावनिक होण्याची नक्कल देखील केली. 'मी तुम्हाला सांगितलं होतं, शेवटच्या सभेत कुणीतरी काहीतरी भावनिक करायचा प्रयत्न करेल. आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो.' असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांची नक्कल केली. यावर आता रोहित पवार यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
advertisement
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
एक बारामतीकर म्हणून मी भाषण केलं, ते पवार कुटुंबातील सदस्य म्हणून केलेलं भाषण होतं. पवार साहेबांचं वय अजित पवारांनी काढलं हे वाईट होतं. मी भावनिक झालो त्यामागे कुठलाही हेतू नव्हता. सामान्य जनता काय म्हणते ते महत्त्वाचे आहे. ईडी जेव्हा आली तेव्हा त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले होते. आम्ही भावनिक झालो कारण तिथे लोकं मोठ्या संख्येने होते असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
