नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे?
मला निवडून आणून जर तुम्ही चूक केली असेल तर मला पक्षात घेण्यासाठी दहा - दहा वेळा का गळ घालत होते? मला पवार साहेबांनी संधी दिली आणि आजही मी शरद पवार साहेबांसोबत प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहे, मी तुमच्यासारखी भूमिका बदलत नाही. असं जोरदार प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना दिलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, अजित पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रश्नाला व त्यांच्या टीकेला मी उत्तर देणे हे उचित नाही. परंतु त्यांनी जे वैयक्तिक आक्षेप घेतले आहेत ते योग्य नाहीत. सेलिब्रिटी उमेदवाराबद्दल त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. परंतु मी नम्रतापूर्वक एक गोष्ट दादांच्या निदर्शनास आणून देतो आपण ज्या उमेदवरांची नावं सेलिब्रिटी म्हणून सांगितली आहेत, त्यातील एकालाही संसदरत्न पुरस्कार मिळालेला नाहीये.
मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे आणि मी केलेल्या कामामुळे पहिल्याच टर्मला तब्बल तीन वेळा मला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. असा उमेदवार देऊन चूक केली म्हणात, मग याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या चुकीची कबुली स्वत: देत आहात. मी आपल्याकडे राजीनाम्याबाबत बोललो असं तुम्ही वारंवार सांगत आहात, पण मग मी संसदेत प्रश्न उपस्थित करणं सोडून दिलं होतं का? मी संसदेत बोलंण सोडून दिलं होतं का? मी संसदेत उपस्थित नव्हतो का असा सवालही यावेळी अमोल कोल्हे यांनी केला आहे.
