TRENDING:

या अंगारकी चतुर्थीला स्वस्तात अष्टविनायक दर्शन! पुण्यातून खास बस सेवा, कसं करायचं बुकिंग?

Last Updated:

अष्टविनायक दर्शनासाठी जाणारी ही विशेष बस ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून मार्गस्थ होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: नवीन वर्षातील पहिल्या 'अंगारकी संकष्टी चतुर्थी'चे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) भाविकांसाठी अष्टविनायक दर्शन विशेष बस सेवा जाहीर केली आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही प्रमुख आगारांतून ही बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन आरक्षणाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
पुण्यातून खास बस सेवा (फाईल फोटो)
पुण्यातून खास बस सेवा (फाईल फोटो)
advertisement

प्रवासाचे नियोजन आणि वेळ:

अष्टविनायक दर्शनासाठी जाणारी ही विशेष बस ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून मार्गस्थ होईल. दोन दिवसांच्या या सहलीमध्ये अष्टविनायकाची आठही मंदिरे कव्हर केली जाणार आहेत. या प्रवासादरम्यान भाविकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था 'भक्ती निवास' येथे केली जाईल. मात्र त्याचा खर्च प्रवाशांनी स्वतः करायचा आहे.

advertisement

ऑनलाइन बुकिंगची सुविधा:

गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी एसटी महामंडळाने ऑनलाइन बुकिंगची सोय केली आहे. भाविक www.msrtc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महामंडळाच्या मोबाइल अ‍ॅपवरून आपल्या जागा आरक्षित करू शकतात. याशिवाय खाजगी अधिकृत बुकिंग केंद्रांवरूनही तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

PMTमुळे 16 दिवसात गेले 4 जीव; नागरिकांची 'गांधिगिरी', स्थानकावर जात धरले पाय, अन्...

advertisement

मोठ्या ग्रुपसाठी 'स्वतंत्र बस'ची संधी: ज्या गृहनिर्माण संस्था किंवा मंडळांचे ४० पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी एकाच वेळी जाणार असतील, त्यांच्यासाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. अशा ग्रुपला त्यांच्या सोयीनुसार स्वतंत्र एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली आहे. यामुळे भाविकांना आपल्या मित्र-परिवारासह एकत्र प्रवास करणे सोपे होणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
काळ्या तिळाची झाली भाव वाढ, आले आणि केळीचे गुरुवारी काय दर? Video
सर्व पहा

अंगारकी चतुर्थीला अष्टविनायक दर्शनासाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांनी वेळेत आपले बुकिंग निश्चित करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
या अंगारकी चतुर्थीला स्वस्तात अष्टविनायक दर्शन! पुण्यातून खास बस सेवा, कसं करायचं बुकिंग?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल