PMTमुळे 16 दिवसात गेले 4 जीव; नागरिकांची 'गांधिगिरी', स्थानकावर जात धरले पाय, अन्...

Last Updated:

पुणे महानगर परिवहन महामंडळाची (PMPML) सेवा आता नागरिकांच्या प्रवासासाठी की त्यांच्या जिवावर उठण्यासाठी आहे? असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.

PMTमुळे 16 दिवसात गेले 4 जीव
PMTमुळे 16 दिवसात गेले 4 जीव
पुणे : पुण्यात अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. जवळपास दररोज अपघाताच्या काही ना काही घटना समोर येत राहतात. यात पीएमपीच्या अपघाताच्या घटनांचाही समावेश आहे. यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाची (PMPML) सेवा आता नागरिकांच्या प्रवासासाठी की त्यांच्या जिवावर उठण्यासाठी आहे? असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या अवघ्या १६ दिवसांत पीएमपीएल बसमुळे ४ जणांचा मृत्यू झाला असून, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा 'यमदूत' झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
नुकतंच हडपसर गाडीतळ परिसरात पीएमपीएल चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी पोस्ट करत म्हटलं की,हे केवळ अपघात नव्हे, तर व्यवस्थेचा खून आहे. एकापाठोपाठ एक होणाऱ्या या अपघातांकडे केवळ 'अपघात' म्हणून पाहता येणार नाही. हा प्रशासकीय यंत्रणेचा आणि नियोजनाचा गंभीर पराभव आहे. वारंवार होणाऱ्या चुका, चालकांचा निष्काळजीपणा आणि देखभालीचा अभाव यामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. या जीवघेण्या प्रवासाला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
advertisement
सामाजिक कार्यकर्त्यांची 'गांधीगिरी' : हडपसरमधील या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. त्यांनी चक्क पाय धरून 'गांधीगिरी' केली आणि विचारले, "तुम्हाला माणसं मारायचा परवाना मिळाला आहे का?" प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या चालकांकडून अशी चूक कशी होते, याचे उत्तर त्यांनी मागितले. या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असले तरी, प्रशासनाचे डोळे कधी उघडणार, हा खरा प्रश्न आहे.
advertisement
advertisement
हडपसरमधील या अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, दोषी चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. जर पीएमपीएल सेवा प्रवाशांना सुरक्षितता देऊ शकत नसेल, तर या व्यवस्थेचा उपयोग काय, असा संताप सामान्य पुणेकर व्यक्त करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
PMTमुळे 16 दिवसात गेले 4 जीव; नागरिकांची 'गांधिगिरी', स्थानकावर जात धरले पाय, अन्...
Next Article
advertisement
ZP Election: ...तर गेम ओव्हर! जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या निर्णयाने राजकारण तापलं
...तर गेम ओव्हर! ZP Election साठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या
  • ...तर गेम ओव्हर! ZP Election साठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या

  • ...तर गेम ओव्हर! ZP Election साठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या

  • ...तर गेम ओव्हर! ZP Election साठी नवा नियम, उमेदवारांचं टेन्शन वाढलं, सरकारच्या

View All
advertisement