ट्रेड अप्रेंटिसशिप पदासाठी वयोमर्यादा 24 वर्षांपर्यंतची असणार आहे. एकूण पदसंख्या 40 असणार आहे. पेंटर, कार्पेंटर, डिझेल मॅकेनिक, फिटर, टर्नर, प्लंबर, वेल्डर, वायरमन, इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रॉनिक मॅकेनिकसह अन्य काही पदांसाठी अप्रेंटिसशिप आहे. इच्छूक उमेदवारांनी ट्रेड अप्रेंटिसशिपच्या जाहिरातीच्या PDF वरून अधिकाधिक माहिती मिळवा. खुल्या प्रवर्गासाठी, अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग आणि शारिरीक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 40 जागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी असलेल्या तरूणांना स्टायपेंड देखील मिळणार आहे.
advertisement
ज्या उमेदवाराने एक वर्षाचा आयटीआयचा कोर्स केला आहे, त्याला 7700 इतके मासिक वेतन मिळणार आहे. तर, ज्या उमेदवाराने दोन वर्षांचा आयटीआयचा कोर्स केला आहे, त्याला 8050 इतके मासिक वेतन मिळणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्जपद्धती असली तरीही मुलाखत पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुलाखत 10 ऑक्टोबर 2025 रोजी होणार असून कार्यशाळा (ESU), CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण रोड, पुणे 411008 हा मुलाखतीचा पत्ता आहे. मुलाखतीला जाताना अनेक आवश्यक कागदपत्रांची गरज लागणार आहे. त्यासाठी अर्जदारांनी जाहिरातीची PDF एकदा आवश्यक वाचावी. शिवाय, उमेदवारांना मोफत पद्धतीने हा ऑनलाईन अर्ज आहे.