पुणे : आपल्याला नेहमीच निसर्गात रमायला आवडत. पण आपण कधी निसर्गासाठी काही करतो का? निसर्गरम्य जागा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे ही आपली नेहमीच तक्रार असते पण त्यासाठी आपण कधीच काही करत नाही. यालाच अपवाद ठरले आहेत पुण्यातील नारगोळकर परिवार ज्यांनी स्वतःच्या खाजगी जागेत एक जंगल उभारलं आहे. इथे विविध प्रकारची जैवविविधता आपल्याला आढळून येते. हे जंगल 22 एकरमध्ये असून फुलपाखरांची बाग देखील तयार केली आहे.
advertisement
पुण्यातील पानशेत रोडकडे असणारे सिपना जंगल असून नारगोळकर परिवार गेली अनेक वर्ष झालं त्याचे जतन हे करत आहे. 400 पेक्षा ही अधिक वेगळ्या प्रकारचे झाडं, औषधी वनस्पती आणि असे अनेक झाडं त्यांनी गेल्या 20 ते 25 वर्षात लावली आहेत. त्यांनी या प्रकल्पाला सिपना असे नाव देऊन त्यासोबतच नक्षत्रवन, बटरफ्लाय गार्डन अशा अनेक संकल्पना अमलात आणल्या.
740 झाड प्रतिकूल परिस्थितीत जगवली, भाव नसल्याने शेतकरी हतबल,बागेवर फिरवला जेसीबी
मी आणि माझे पती अनेक जंगल हे फिरल्यानंतर त्यातून कल्पना आली की आपण एका जंगलाचे मॉडेल तयार करू. शैक्षणिक दृष्ट्या त्याचा फायदा होईल. यासाठी 22 एकरमध्ये कमीत कमी झाडे लावली आहेत. या जंगलात फुलपाखरांची बाग ही फुलवली आहे. इथे असणाऱ्या झाडावर कमीत कमी 60 ते 62 प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती या इथे आढळून आल्या आहेत. या जंगलामध्ये कमीत कमी 400 हून अधिक प्रकारची झाडे ही आहेत. यामध्ये काही दुर्मिळ प्रजाती देखील आहे. रुद्राक्ष, अर्जुन, कमंडलू, कृष्ण वड ही झाडे बघण्यासाठी आणि बॉटनिकलचे विद्यार्थी हे अभ्यास करण्यासाठी येतात, अशी माहिती नयना नारगोळकर यांनी दिली आहे.