दुसऱ्या एका वैमानिकाची निवड
मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार यांचं विमान दुसराच पायलट चालविणार होता. कंपनीने बारामती उड्डाणासाठी दुसऱ्या एका वैमानिकाची निवड केली होती. मात्र, तो वैमानिक विमानतळावर मुंबईत वाहतूक कोंडीत अडकल्यानं त्याला उशीर होत होता. तर दुसरीकडे अजित पवार यांना उशीर होत असल्याने कंपनीने कॅप्टन कपूर यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. कॅप्टन सुमित कपूर हे साधेसुधे कॅप्टन नव्हते. त्यांना 15000 हून अधिक तास विमान उडवण्याचा अनुभव होता.
advertisement
अपघाताच्या काही तास आधी....
कॅप्टन कपूरचे मित्र म्हणाला की, सुमीत एक अत्यंत अनुभवी पायलट होता आणि अशी चूक होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यांनी अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कॅप्टन सुमित कपूर काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगहून परतला होता. अपघाताच्या काही तास आधी त्याला विमान उड्डाणाची माहिती मिळाली होती, अशी माहिती कॅप्टन सुमितचे मित्र जी. एस. ग्रोवर यांनी दिली आहे.
पाचही जणांचा जागीच मृत्यू
दरम्यान, विमानातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये कॅप्टन सुमित कपूर, सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव यांचा समावेश आहे. कपूर यांचा अपघात झाला ही बातमी ऐकल्यावर सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसला नाही. ते अत्यंत अनुभवी आणि शिस्तप्रिय वैमानिक होते. त्यांच्यासारख्या व्यक्तीसोबत असे घडू शकते, हे पचवणे कठीण असल्याचं कॅप्टन कपूरच्या मित्राने म्हटलं आहे.
