याप्रकरणी अमर पुण्याराम सिंग भैरव (वय ३२, रा. निगडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, भोसरी पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे आदित्य लक्ष्मण विरणक (वय २४, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) आणि उद्धव उत्तम पाटोळे (वय २५, रा. भोसरी) अशी आहेत.
advertisement
'पहिल्या ॲनिवर्सरीला माझ्याकडे ये'; पुण्यातील डॉक्टर पतीची कोर्टात धाव, पण पुढं भलतंच घडलं
कारमध्ये घुसून हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर सिंग हे त्यांच्या कारमध्ये बसलेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या या दोन्ही अनोळखी इसमांनी त्यांच्या कारमध्ये प्रवेश केला. कोणतेही कारण नसताना त्यांनी अमर सिंग यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांचा मौल्यवान मोबाइल फोन आणि कारची चावी बळजबरीने हिसकावून घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर अमर सिंग यांनी तातडीने भोसरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास करून दोघा आरोपींना काही तासांतच अटक केली आहे. भोसरी पोलीस या घटनेमागील नेमके कारण आणि आरोपींचा हेतू काय होता, याचा पुढील तपास करत आहेत.
