मशीन आणि सर्व्हरमध्ये वारंवार बिघाड
शहरात ई-पॉस मशीन आणि सर्व्हरच्या सततच्या बिघाडामुळे धान्य वाटपाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिन्याच्या सुरुवातीपासूनच ही अडचण सुरू असून रेशन दुकानांमध्ये वितरण प्रक्रिया वारंवार ठप्प होत आहे. धान्य घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना मशीन बंद असल्याचे अनेकदा रिकाम्या हाताने परतावं लागतं. काही ठिकाणी तासन्तास वाट पाहूनही वितरण सुरू होत नाही. फिंगरप्रिंट जुळत नसल्याने प्रक्रिया पुढे सरकत नाही. याबाबत पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र समस्येवर अद्याप कोणताही ठोस उपाय केला जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
advertisement
2 दुचाकीस्वारांनी रस्त्यात कार थांबवली; मग आत घुसून...पिंपरीतील धक्कादायक घटना
निगडी, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही परिमंडळांतील पुरवठा विभागांमार्फत एकूण 4,93,873 लाभार्थ्यांना दरमहा धान्य दिले जाते. मात्र, डिसेंबर महिन्याचे धान्य काही भागांत अजून पोहोचलेले नाही. शहरासाठी 488 टन ज्वारी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अनेक रेशन दुकानांमध्ये ती अद्याप आलेली नसल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.
ऑल महाराष्ट्र रेशन दुकानदार संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता यांनी सांगितले की, ई-पॉस मशीनमधील तांत्रिक अडचणींमुळे मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत धान्य वाटप पूर्णपणे बंद होते. गुरुवारीही दिवसभर मशीन सुरू नसून रात्री उशिरा काही ठिकाणीच प्रणाली कार्यान्वित झाली. शुक्रवारी तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर धान्य वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.






