नकुल भोईर हे पत्नी चैताली हिला 'मद्यपान न करण्याबद्दल, परपुरुषांसोबत फिरू नकोस आणि कर्ज काढू नकोस', अशा गोष्टी वारंवार सांगत होते. याच गोष्टींचा राग मनात धरून चैतालीने नकुलच्या हत्येचा कट रचला आणि प्रियकराच्या मदतीने तिने नकुलचा जीव घेतला. चिंचवड पोलिसांच्या तपासाने हत्येच्या घटनेमागील सत्य समोर आलं असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे सहा महिन्यापूर्वी प्रियकर सिद्धार्थ पवारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर परिसरात लावण्यात आले होते. या बॅनरचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
advertisement
हत्येच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण
चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ पवार याचा वाढदिवस हा एप्रिल महिन्यात असतो. २६ एप्रिलला नकुल आणि चैतालीने शुभेच्छा दिलेला बॅनर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी नकुल यांना पत्नी चैतालीचे सिद्धार्थसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चैतालीला आधी समजून सांगितले . मात्र त्यानंतरही चैताली आरोपी सिद्धार्थला भेटायची आणि त्यावरून दोघांमध्ये टोकाचे वाद व्हायचे. हत्येच्या दिवशी देखील दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते.
पत्नीला नगरसवेक करण्याच्या तयारीत
मृत नकुल भोईर हा पत्नीला नगरसेवक बनवण्याच्या तयारीत होता. नकुलचा सामाजिक कार्यामध्ये मोठा वाटा होता, मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक उपक्रमामध्ये तो जिकरीने सहभाग घ्यायचा अनेक संघटनांची देखील त्याचे संबंध राजकीय नेत्यांशी देखील त्याचे जवळचे संबंध होते, सामाजिक कार्याचा वारसापुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचे ठरवलं होते यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला उभे देखील करणार होता. त्या अगोदरच चैतालीने पतीला संपवलं.
1 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
दरम्यान आता नकुल भोईर यांच्या खुन केल्या प्रकरणी सिद्धार्थ पवार ला अटक करून न्यायालय समोर हजर केले असता पुढील तपासकामी दोन्ही आरोपींना 1 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिली आहे.
हे ही वाचा :
