Pimpri Murder: कपड्याचं एक टोक प्रियकराकडे, एक बायकोकडे, नवऱ्याला क्रूरपणे संपवलं; पिंपरीची हादरवणारी कहाणी
- Published by:Prachi Amale
- Reported by:Govind Wakde
Last Updated:
चैताली ज्या कापडाने नकुलचा गळा आवळत होती त्याचं दुसरं टोक सिद्धार्थने ओढलं आणि जोराचा हिसका देऊन दोघांनीही नकुलचा निर्घृण खून केला.
पुणे : पिंपरी चिंचवड मधील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खून प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. पत्नी चैतालीनेच नकुलचा गळा आवळून खून केल्याची माहिती आली. मात्र , नकुलचा खून करताना, तिच्या संबंधात असलेल्या तिचा मित्र सिद्धार्थ पवार हा देखील सोबत होता , आणि दोघांनी मिळून कट रचून नकुलचा निर्घुण खून केल्याची माहिती आता समोर आली आहे. या धक्कादायक माहितीमुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पत्नी चैतालीचे आरोपी सिद्धार्थ सोबत अनैतिक संबंध होते ही बाब नकुलला कळाली तेव्हा त्याने चैतालीला आधी समजून सांगितले. मात्र ,त्या नंतरही चैताली आरोपी सिद्धार्थला भेटायची आणि त्यावरून दोघांमध्ये टोकाचे वाद व्हायचे अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान घटनेच्या दिवशी देखील हेच घडलं मात्र , यावेळी केवळ चैताली एकटीच नव्हती नाही तर तिचा मित्र सिद्धार्थ पवार देखील तिच्या सोबत होता. दुपारपासून चैताली आणि नकुल भोईर यांच्यात चारित्र्यावर संशय घेण्यावरून वाद झाला एवढच नाही तर हा वाद एवढा विकोपाला गेला की चैतीलीला मारहाण देखील झाली.
advertisement
जोराचा हिसका दिला अन् नकुल जागेवरच गेला
रात्री या वादाने रात्री उशिरा रागाची परिसीमा गाठली आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नकुलची पत्नी आरोपी चैतालीने नकुलचा कापडाने गळा आवळायला सुरवात केली. त्यावेळी नकुल जीवाच्या आकांताने प्रतिकार करू लागलाय ते बघून तिथेच उपस्थितीत असलेल्या सिद्धार्थने चैताली ज्या कापडाने नकुलचा गळा आवळत होती त्याचं दुसरं टोक ओढलं आणि जोराचा हिसका देऊन दोघांनीही नकुलचा निर्घृण खून केला.
advertisement
जबाब बदलला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला
नकुल गतप्राण झाल्याचं चैतालीच्या लक्षात आलं. तेव्हा तिने आपला मित्र सिद्धार्थला तिथून जाण्यास सांगितले. पती नकुलच्या खुनाचा सर्व आरोप स्वतःवर घेत पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी पत्नी चैताली हिला ताब्यात घेतलं. मात्र घटनास्थळी तीन जणांनी मद्य प्राशन केले असल्याची शक्यता पोलिसांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी आरोपी चैतालीला विचारले आणि तिने सिद्धार्थचे नावं सांगितले . पोलिसांनी सिद्धार्थला तत्काळ ताब्यात घेतलं आणि त्याच्या उपस्थित राहण्या संदर्भात त्याचा जबाब नोंदविला आणि इथेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
advertisement
खाक्या दाखवताच दिली गुन्ह्याची कबुली
आरोपी सिद्धार्थ याने आपल्या जबाबात दिलेली माहिती नुसार पोलिसांनी घटना स्थळावरील CCTV फुटेज तपासले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, सिद्धार्थ ने जाबाबत दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात cctv मध्ये दिसणारी दृश्य यामध्ये बरीच तफावत आहे. खासकरून आरोपी सिद्धार्थ हा घटनास्थळावर येणे आणि परत जाणे या दरम्यान असलेली वेळ जुळत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. सिद्धार्थ पवारला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
1 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी
दरम्यान आता नकुल भोईर यांच्या खुन केल्या प्रकरणी सिद्धार्थ पवार ला अटक करून न्यायालय समोर हजर केले असता पुढील तपासकामी दोन्ही आरोपींना 1 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक गोसावी यांनी दिलीय
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 29, 2025 6:49 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri Murder: कपड्याचं एक टोक प्रियकराकडे, एक बायकोकडे, नवऱ्याला क्रूरपणे संपवलं; पिंपरीची हादरवणारी कहाणी


