वडगावशेरीत पठारेंचा जलवा कायम
पारंपारिक आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या वडगावशेरी, वाघोली, येरवडा या भागात कमळ फुलले आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपचे शैलजीत बनसोडे, सुरेंद्र पठारे, रत्नमाला सातव तृप्ती भरणे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. पठारेंनी प्रभाग क्रमांक 3 आणि 4 या प्रभागात सुरेंद्र पठारे यांच्या रूपाने भाजपने पहिल्यांदा 8 ही उमेदवार निवडून आणले आहेत. ऐश्वर्या पठारे यांनी देखील प्रभाग क्रमांक 4 मधून विजय मिळवला आहे.
advertisement
सुरेंद्र पठारेंची संपत्ती किती?
सुरेंद्र पठारे यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता २७१ कोटी ८५ लाख २१ हजार ८७७ रुपये इतकी असून, यात प्रामुख्याने स्थावर मालमत्तेचा मोठा वाटा आहे. पठारे कुटुंबाच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य २१७ कोटी ९३ लाख ४ हजार ८८७ रुपये इतके नोंदवण्यात आले आहे. यामध्ये जमिनी, व्यावसायिक इमारती आणि निवासी मालमत्तांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पठारे यांच्यावर सार्वजनिक वित्तीय संस्थांचे आणि इतर देणी मिळून एकूण ४६ कोटी ५९ लाख ८९ हजार २६२ रुपये इतके कर्ज आहे.
कोण आहे सुरेंद्र पठारे?
दरम्यान, उच्च शिक्षित, उद्योजक आणि दूरदृष्टी असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी देखील तळागाळापर्यंत पोहचत मतदारांचा विश्वास जिंकला. पूर्व पुण्याचा विकास मॉडेल सर्वांपर्यंत पोहोचवले. ज्या जिवावर सुरेंद्र यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी केवळ स्वीकारलीच नाही तर ती यशस्वीपणे पार पाडत पत्नी ऐश्वर्या पठारे यांचा आणि स्वतःचा संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आणला.
