पुणे महानगरपालिकेच्या (PMC) बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रस्त्याच्या कडेला लावलेले हे खांब आणि दिवे चोरून नेले आहेत. चोरीला गेलेल्या साहित्याचे अंदाजित मूल्य 12 लाख रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे. या चोरीमुळे रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य पसरलं असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
चोर आल्याचं समजलं; मध्यरात्रीच तरुणांकडून 2 तास पाठलाग, थरारक घटनेत शेवटी काय घडलं?
या गंभीर घटनेनंतर, बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालयाच्या अभियंत्याने तातडीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा (FIR) नोंदवला असून, या चोरीचा तपास सुरू केला आहे. पथदिवे आणि खांब चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर महापालिकेकडून तक्रार देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली.
इतक्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्ता, विशेषतः खांब आणि दिवे, लंपास झाल्यामुळे ही चोरी संघटित टोळीने केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चोरीला गेलेल्या सामानाचा शोध घेऊन आरोपींना लवकर अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
