महानगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात रस्ते आणि वाहतुकीच्या प्रकल्पांचे नियोजन करून निधी दिला जातो. 2022 मध्ये महानगरपालिकेने एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने वाहतूक कोंडीचा अभ्यास केला होता. महानगरपालिका हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा डीपी आणि आरपी समोर ठेवून प्रतिक्षा ठिकाणावर जाऊन रस्त्यांची पाहणी केली गेली. या केलेल्या पाहणीत शहरातील व समाविष्ट केलेल्या गावांमध्ये 700 ठिकाणी मिसिंग लिंक आणि इतर कारणांमुळे रस्ते रखडल्याचं निदर्शनास आलं. शहरातील 520 किलोमीटरचे रस्ते तुकड्यांमध्ये विभागले गेल्याने त्यांचा वापर होत नाही. मात्र, मिसिंग लिंक जोडल्या तर सुमारे 500 मीटर किलोमीटर अंतराचे रस्ते वापरासाठी उपलब्ध होणार आहेत.
advertisement
Pune News: मावळातला ‘तो’ वाद पेटणार? 6 गावचे शेतकरी एकवटले, सरकारला दिला थेट इशारा
'या' मिसिंग लिंकसाठी होणार सक्तीने भूसंपादन
कोथरूड कर्वेनगर वारजे
डॉक्टर आंबेडकर चौक ते राजाराम ब्रिज
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते रोजरी स्कूल अंडरपास
शीला विहार ते भीम नगर कोथरूड
मिलन सोसायटी ते कर्वे पुतळा
बाणेर पाषाण
बाणेर पॅन कार्ड क्लब ते ननवरे अंडरपास
बाणेर ते पाषाण लिंक रोड
गणराज चौक ते कस्पटे वस्ती
नगर रोड ते बालेवाडी स्टेडियम
सुतारवाडी ते सुस वाकेश्वर चौक
सुस उड्डाणपूल सर्व्हिस रोड
पाषाण सर्कल ते सोमेश्वर चौक
कोंढवा
व्हीआयटी कॉलेज ते कोंढवा रोड
कोंढवा फॉरेस्ट एन. आय. बी. एम. रोड
नगर रोड-विमानतळ-खराडी
गुंजन चौक ते कल्याणी नगर
कल्याणी नगर ते खराडी रस्ता
509 चौक ते धानोरी रोड
विमानतळ रोड ते पेट्रोल साठा ते शुभ चौक
मुंडवा आणि हडपसर
एबीसी चौक ते ताडी ग्रुप
किर्लोस्कर पूल ते मगरपट्टा दक्षिण रोड
मुंडवा आर. ओ. बी. ते केशवनगर
अॅमनोरा ते केशवनगर
रेल्वे लाईन ते लोहिया गार्डन सोलापूर रोड
सिंहगड रोड
हुमे पाईप ते प्रयेजा सिटी
सातारा रोड
सिताराम आबाजी बिबवे पथ ते सातारा रोड






