जाणून घ्या नेमक घडलं काय?
हे प्रकरण आहे पुणे शहरात असलेल्या पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारातील. जिथे एका महिला कंडक्टरने आर्थिक फायद्यासाठी स्वत:च्या शरीराचा वापर करुन तीन व्यक्तींची फसवणूक केली आहे. वारंवार ती या गोष्टीचा फायदा घेत वेळोवेळी त्यांच्याकडून मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम उकळली.
अखेर महिलेविरोद्धात गुन्हा दाखल...
पुण्यातील या घटनेप्रकरणी गेल्या महिन्यात 17 सप्टेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात महिला कंडक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देणे तसेच खंडणीची मागणी करणे याशिवाय पीडित व्यक्तींविरोधात पोलिसांकडे बनावट तक्रार दाखल करण्याचे आरोप आहेत. सध्या पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
पोलिसांनी अखेर महिलेला अटक केली. हनीट्रॅपच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन अटक झाल्यानंतर पीएमपी महामंडळ प्रशासनाने चौकशीसाठी संबंधित महिलेला निलंबित केले आहे. या संदर्भात पीएमपीएमएल प्रशासनाने निलंबनाचे पत्र जारी केले आहे.