अपघातांच्या सत्राला ब्रेक लावण्यासाठी 'पीएमपी' अॅक्शन मोडमध्ये:
गेल्या काही दिवसांत प्रामुख्याने भाडेतत्त्वावरील बसचे अपघात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही निष्काळजी चालकाची गय केली जाणार नाही.
नव्या नियमावलीतील प्रमुख अटी आणि उपाययोजना:
वेग मर्यादा: पीएमपी बस आता ताशी ६० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावणार नाही. यावर प्रशासनाचे विशेष लक्ष असेल.
advertisement
लेनची शिस्त: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बस नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या लेनमध्येच चालवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Konkan Railway : LLT - करमाळी ट्रेनला मुदतवाढ, तारीख आणि वेळ आताच नोट करून घ्या
बसस्थानके, गर्दीची भाजी मंडई, सिग्नल आणि चौकांमध्ये बसच्या वेगावर चालकांचे पूर्ण नियंत्रण असणे अनिवार्य आहे. बीआरटी मार्ग, उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांवर (Service Roads) बस चालवताना चालकांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. दर आठवड्याला प्रत्येक आगारात दोन्ही शिफ्टमधील चालकांसाठी ‘गेटमिटिंग’ आयोजित करून त्यांना सुरक्षित प्रवासाचे धडे दिले जातील.
"चालक निष्काळजीपणे बस चालवताना आढळल्यास त्याच्यावर आणि संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात येईल. सुरक्षित प्रवासाला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे." — पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, PMPML.
