शहरातील वाढत्या रात्रीच्या प्रवासाच्या गरजेला लक्षात घेऊन PMPML ने सहा प्रमुख मार्गांवर रातराणी बस सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे आता नागरिकांना मध्यरात्रीनंतर घरी पोहोचण्यासाठी किंवा पहाटेच्या प्रवासासाठी खासगी वाहनांची किंवा महागड्या टॅक्सींची गरज उरलेली नाही.
advertisement
रातराणी सेवेअंतर्गत खालील मार्गांवर बस धावणार आहेत:
- कात्रज – वाकडेवाडी (नवीन एसटी स्थानक): कात्रजहून प्रस्थान – रात्री ११.३०, ०१.३०, ०३.३०; वाकडेवाडीहून – १२.३०, ०२.३०, ०४.३०
- कात्रज – पुणे स्टेशन: कात्रजहून – ११.००, १२.३०, ०२.००, ०३.२५; पुणे स्टेशनहून – ११.५०, ०१.२०, ०२.४०, ०४.१०
- हडपसर – स्वारगेट: हडपसरहून – १०.२०, ११.४०, ०१.००, ०३.४५; स्वारगेटहून – १०.५०, १२.२०, ०१.४०, ०४.१५
- हडपसर – पुणे स्टेशन: हडपसरहून – १०.२०, ११.४०, ०१.००, ०३.४५; पुणे स्टेशनहून – १०.५०, १२.२०, ०१.४०, ०४.१५
- निगडी – पुणे स्टेशन (वाकडेवाडी मार्गे): निगडीहून – ११.३०, ०१.३०, ०३.३०; पुणे स्टेशनहून – १२.३०, ०२.३०, ०४.३०
- पुणे स्टेशन – कोंढवा गेट: पुणे स्टेशनहून – १०.००, १२.३०, ०३.४५; कोंढवा गेटहून – ११.१५, ०१.४५, ०५.००
या सेवेच्या माध्यमातून PMPML ने रात्रीच्या वेळी सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देत पुणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांसाठी राखीव जागा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली असल्याने प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे.
रातराणी बस सेवेमुळे आता पुण्यातील कामगार वर्ग, विद्यार्थी आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना रात्रीच्या वेळेसही शहरभर प्रवास करणे सुलभ झाले आहे. ही सेवा दररोज चालणार असून नागरिकांच्या प्रतिसादानुसार पुढील काळात मार्गांची संख्या वाढविण्याचा विचार PMPML प्रशासन करत आहे.






