फळपीक विमा योजनेसाठी अर्जप्रक्रिया सुरू! पात्रता, नोंदणी कुठे अन् कशी करायची?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Fal Pik Vima : बदलत्या हवामानामुळे राज्यातील फळपिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. अवकाळी पाऊस, अतितापमान, गारपीट, वाऱ्याचा वेग अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.
मुंबई : बदलत्या हवामानामुळे राज्यातील फळपिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. अवकाळी पाऊस, अतितापमान, गारपीट, वाऱ्याचा वेग अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या फळपिकांचे संरक्षण आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाने पुनर्रचित हवामानावर आधारित 'फळपीक विमा योजना' लागू केली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या फळबागांना हवामानातील बदलांपासून विमा संरक्षण मिळणार आहे. नुकतेच या योजनेत सहभागी होण्यासाठी विमा पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या फळपिकांसाठी निर्धारित अंतिम मुदतीपूर्वी विमा अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज कुठे कराल?
शेतकऱ्यांनी या योजनेचा हप्ता भरताना आपल्या “आपले सरकार सेवा केंद्र”, बँक शाखा, किंवा www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्जासोबत फळबागेचा जिओ-टॅगिंग केलेला फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.
advertisement
कागदपत्रे कोणती?
बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी काही आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. यात खालील कागदपत्रांचा समावेश आहे.जसे की,
पूर्ण भरलेले विमा प्रस्ताव पत्रक
सातबारा उतारा (फळबागेची नोंद असलेला)
आधार कार्ड
स्वयंघोषणापत्र
फळबागेचा जिओ-टॅगिंग फोटो
तसेच विमा हप्त्याची रक्कम जमा केल्याचा पुरावा
हे सर्व कागदपत्रे संबंधित बँक शाखा, कृषी सेवा सोसायटी (वि.का.स.) किंवा सीएससी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
advertisement
पात्रता काय असणार?
या योजनेत फक्त उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण मिळणार आहे.
कोकण विभागासाठी किमान क्षेत्र मर्यादा १० गुंठे,
तर सर्व फळपिके आणि दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी जास्तीत जास्त ४ हेक्टर (सुमारे १० एकर) इतकी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
योजनेचे फायदे काय?
ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळवून देईल. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, उष्णतेची लाट, वादळी वारे अशा घटनांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल. शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य संरक्षण मिळेल आणि आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत होईल. या योजनेत सहभागी झाल्याने फळउत्पादनाशी संबंधित जोखमींचे प्रमाण कमी होईल.
advertisement
अधिक माहितीसाठी संपर्क कुठे कराल?
view commentsयोजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सहायक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 7:26 AM IST


