TRENDING:

PMPML Navratri Special : भाविकांसाठी गुड न्यूज... नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी PMPML ची पर्यटन बससेवा, तिकिटाची किंमत किती?

Last Updated:

PMPML Navratri Special Bus : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर आणि सोयीचा व्हावा यासाठी परिवहन मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उद्यापासून देशभरासह राज्यामध्ये नवरात्रोत्सव सुरू होणार आहे. अगदी मोठमोठ्या मंडळांपासून ते घरगुतीपर्यंत सर्वत्र देवीची जोरदार तयारी केली जात आहे. नवरात्रीत मोठ्या प्रमाणावर भाविक घराबाहेर देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या ठिकाणी गरबा- दांडिया खेळण्यासाठी जात असतात. प्रवाशांचा विचार करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर आणि सोयीचा व्हावा यासाठी परिवहन मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
News18
News18
advertisement

सिंहगडावर फिरायला जाताय? किल्ल्यावरील 'ही' ठिकाणं आवर्जून बघावीत

पुणे, पिंपरी- चिंचवड शहरासह जिल्ह्यातील देवींची शक्तिस्थळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पीएमपीएमएलकडून दोन विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीबरोबरच ग्रुप बुकिंगसाठी बससेवा उपलब्ध होणार आहे, या सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंडळाकडून करण्यात आले आहे. २३ सप्टेंबर २०२५ पासून विशेष पर्यटन बससेवाला सुरूवात होणार आहे. विशेष पर्यटन असणारी बस पूर्णपणे वातानुकूलित आणि स्मार्ट इलेक्ट्रिक असणार आहे. शिवाय, पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा वापर करून या बस तयार करण्यात आल्या आहेत.

advertisement

भाविकांना बस प्रवासादरम्यान आरामदायी अनुभव मिळणार आहे. शिवाय, पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे. भाविकांच्या वाढत्या मागणीनुसार आणि परिवहन महामंडळाच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. बससेवेचे बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, पुणे मनपा भवन, भोसरी बसस्थानक आणि निगडी येथील पीएमपीएमएलच्या पास केंद्रांवर करता येणार आहे. यामुळे शहराच्या विविध भागातील भाविकांना बुकिंग करणे सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहेत. या सेवेला पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर कशापद्धतीने प्रतिसाद देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

advertisement

नरिमन पॉईंट ते मिरा- भाईंदर केवळ अर्ध्या तासात, ट्रॅफिकची कटकट कायमची मिटणार

विशेष पर्यटन बससेवेअंतर्गत दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या बससेवेत पुणे स्टेशनवरून सुटून स्वारगेट, तळजाई माता मंदिर, पद्मावती मंदिर, तुकाई माता मंदिर कोंढाणपूर, श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी माता मंदिर कोडीत (ता. पुरंदर), यमाई माता मंदिर शिवरी (ता. पुरंदर), स्वारगेट आणि पुन्हा पुणे स्टेशन असा प्रवास होईल. ही बस सकाळी ८:३० वाजता पुणे स्टेशनवरून सुटेल आणि संध्याकाळी ७ वाजता परत येईल. प्रवाशांना दिवसभर विविध शक्तिस्थळांचे दर्शन घेता येणार असून, प्रति प्रवासी ५०० रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे.

advertisement

दुसरी बससेवा, पुणे स्टेशनवरून सुटून स्वारगेट, महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, तांबडी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ), चतुशृंगी माता मंदिर (सेनापती बापट रोड), वैष्णवी माता मंदिर, पिंपरी कॅम्प भवानी माता मंदिर, भवानी पेठ, स्वारगेट आणि पुन्हा पुणे स्टेशन असा प्रवास करेल. या बसची वेळ सकाळी ८:३० वाजता सुटून संध्याकाळी ७ वाजता पुणे स्टेशनवर परतेल. या मार्गासाठी सुद्धा प्रति प्रवासी ५०० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. भाविकांना एका दिवसातील बससेवेत अनेक शक्तिस्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.

advertisement

शारदीय नवरात्र म्हणजे काय? 9 दिवस उपवास का करतात? पूजा, विधी आणि महत्त्व

महानगर पालिका देत असलेली बसप्रवास सुरक्षित आणि आरामदायी होईल, शिवाय वाहतुकीची समस्याही टळेल. नवरात्रीमध्ये एका बाजूला भाविकांची गर्दी आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणाऱ्या लोकांची गर्दी असते. मुंबई- पुण्यासह प्रमुख शहरांमधील, विविध मंदिरांत भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी, पार्किंगची समस्या यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पीएमपीएमएलची विशेष बससेवा भाविकांसाठी वरदान ठरणार आहे.

मराठी बातम्या/पुणे/
PMPML Navratri Special : भाविकांसाठी गुड न्यूज... नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी PMPML ची पर्यटन बससेवा, तिकिटाची किंमत किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल