अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या संभाषणात काय चर्चा झाली. त्यात अग्रवाल काय बोलले, तावरेंनी काय उत्तर दिली? याबाबत पुणे पोलिसांनी अद्याप काही सांगितलेलं नाही. पुणे पोलिसांनी आतापर्यंत पत्रकार परिषदेत इतर माहिती दिली आहे. विशाल अग्रवालसोबत डॉक्टर तावरेंची चर्चा झाली आणि त्यात काय घडलं हे महत्त्वाचं आहे. विशाल अग्रवाल यांनी अपघाताच्या रात्री आमदार टिंगरे यांना अनेक फोन केले. पण टिंगरेंनी फोन उचलले नाहीत. शेवटी टिंगरे यांना घेण्यासाठी विशाल अग्रवाल थेट घरी गेले अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
advertisement
आमदार टिंगरे यांना विशाल अग्रवालचे 45 कॉल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या रात्री सुनील टिंगरे यांना विशाल अग्रवालचे 45 मिस्ड कॉल आले होते. हे मिस्ड कॉल्स पहाटे 2.30 - 3.45 च्या दरम्यान होते. सुनील टिंगरे पहाटे ३.४५ च्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्यात आले. त्यादिवशी टिंगरे झोपले होते आणि मिस्ड कॉल्स अनुत्तरीत होते हे लक्षात घेऊन विशाल अग्रवाल त्याला घेण्यासाठी टिंगरे यांच्या घरी गेला. त्यानंतर टिंगरे रविवारी पहाटेपर्यंत पोलिस ठाण्यात हजर होते.
रक्ताचे नमुने बदलणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलंय. यासोबत वॉर्डबॉयवरही निलंबनाची कारवाई केली आहे. नियमानुसार सरकारी एखादा कर्मचारी 48 तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस कोठडीत असेल तर त्यांना निलंबित करण्यात येते. अजय तावरे आणि श्रीहरी हालनोर यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीय. निलंबनानंतर त्यांची खात्यांतर्गत चौकशी केली जाईल. दोन्ही डॉक्टर आणि वॉर्डबॉयवर खात्यांतर्गत कारवाई होईल. यात खात्यांतर्गत स्थापन केलेली समिती चौकशी करेल आणि त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.