TRENDING:

Ganeshotsav 2025: बाप्पा महागला! गणेश मूर्तींच्या किमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या

Last Updated:

Ganeshotsav 2025: संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका असलेला गणपती बाप्पा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी (27 ऑगस्ट) दिवसांत घरोघरी विराजमान होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका असलेला गणपती बाप्पा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी (27 ऑगस्ट) दिवसांत घरोघरी विराजमान होणार आहे. त्यामुळे सध्या बाजारात गणपतीसाठी लागणारं साहित्याची रेलचेल दिसत आहे. कलाकारांच्या कारखान्यांमध्येही भाविक मूर्तीची बुकिंग करण्यासाठी गर्दी करत आहे. असं असलं तरी, यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट स्पष्टपणे जाणवत आहे. लहान घरगुती गणपतीपासून ते भव्य सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींपर्यंत सर्वच गणेशमूर्तींच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
advertisement

गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी लागणारी शाडू माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी), कागदी लगदा, रंग, बांबू, लाकूड, गवत यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्याचबरोबर वाहतूक खर्च, ट्रान्सपोर्ट आणि कारागिरांची मजुरी यामध्ये देखील मोठी वाढ झाल्याने मूर्तीच्या किमतीवर थेट परिणाम होत आहे.

'धोंडफळे कला निकेतन स्टुडिओ'तील मूर्तिकार अभिजित धोंडफळे म्हणाले, "आमच्या तीन पिढ्या या व्यवसायात कार्यरत आहेत. आम्ही मातीच्या मूर्ती बनवतो. काही वर्षांपूर्वी आम्ही पेपर पल्पमध्येही गणपती बनवले होते. त्यासाठी आम्हाला पेटंटही मिळाले आहे. गाळाची माती, शाडू माती आणि राईस ब्रान वापरून आम्ही पर्यावरणपूरक मूर्ती बनवतो."

advertisement

Ganpati Ornaments: मुकुट, कंठी, मोदक अन् बरंच काही, फक्त 30 रुपयांपासून ठाण्यात खरेदी करा बाप्पाचे दागिने

महागाईबद्दल बोलताना धोंडफळे यांनी सांगितलं की, मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये दर वर्षी 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होत आहे. या वाढीचा मुख्य परिणाम मूर्तीच्या एकूण उत्पादन खर्चावर झाला आहे. यामुळे घरगुती गणपती मूर्तींच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, सहा फूट किंवा त्याहून मोठ्या सार्वजनिक गणपती मूर्तींसाठी ही दरवाढ 30 ते 40 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

advertisement

सध्या बाजारात पीओपीच्या मूर्ती देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, अनेक ग्राहकांच्या मनात असा समज आहे की, पीओपी मूर्ती शाडू मातीच्या मूर्तींपेक्षा स्वस्त असतात. शाडू माती आणि पीओपी या दोन्ही प्रकारच्या मूर्तींचे दर जवळपास सारखेच आहेत. कारण दोन्ही प्रकारात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढले आहेत.

महागाई जरी वाढली असली तरी गणेशोत्सव हा लोकांच्या जिव्हाळ्याचा उत्सव आहे. त्यामुळे मूर्तीच्या किमती वाढल्या तरीही लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. ग्राहक मूर्ती खरेदीला चांगला प्रतिसाद देत आहेत. अनेकजण पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. भाविकांची श्रद्धा, कलाकारांची मेहनत आणि पर्यावरणाचे भान राखत साजरा होणारा गणेशोत्सव यंदाही सर्वांना एकत्र आणणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Ganeshotsav 2025: बाप्पा महागला! गणेश मूर्तींच्या किमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल