Laxman Hake : शरद पवारांवर आरोप, लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ, हाकेंना थेट सलमान खानच्या दर्जाची सुरक्षा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Laxman Hake Y+ level security : सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आलीये. तसेच त्यांच्या घराच्या बाहेर देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Attack On Laxman Hake : अहिल्यानगरजवळील आरनगाव रस्त्यावर अज्ञातांकडून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती काल समोर आली होती. त्यानंतर हाके यांनी शरद पवार आणि निलेश लंके यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्यावर हल्ला करणारे जो दळवी आणि त्याचे सहकारी आहेत यांचे फोटो आता समोर आले आहेत आणि यांचे फोटो शरदचंद्र पवार आणि निलेश लंके यांच्यासोबत देखील आहेत. या सर्व लोकांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला आहे, असा आरोप हाके यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये.
लक्ष्मण हाके यांना Y+ दर्जाची सिक्युरिटी
माझी आणि या माणसांची काही वैयक्तिक दुश्मनी नाही , पण पवार कुटुंबाने असे गुंडे पोसलेले आहेत आणि आज त्याच गुंडानी माझ्यावर हल्ला केला, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. यानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती मिळाली आहे. लक्ष्मण हाके यांना Y+ दर्जाची सिक्युरिटी देण्यात आली आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आलीये. तसेच त्यांच्या घराच्या बाहेर देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे.
advertisement
पवार कुटुंबाने पोसलेले गुंडं....
माझी आणि या माणसांची काही वैयक्तिक दुश्मनी नाही, पण पवार कुटुंबाने असे गुंडे पोसलेले आहेत आणि आज त्याच गुंडानी माझ्यावर हल्ला केला. पोलिसांचा संरक्षण असताना देखील काल माझ्यावर हल्ला झाला या लोकांना वर्दीची भीती नसावी, यांना माहिती आहे की हल्ला केल्यावर काहीच होत नाही अजून अनेकांवर हल्ला करतील, असा आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
advertisement
हल्लेखोर कोण होते?
दरम्यान, काल नाश्टा केल्यानंतर नांदूरकडे निघाल्यानंतर काही तरुण त्याठिकाणी आले अन् त्यांना हाके यांच्या गाडीवर हल्ला केला. मात्र, या हल्ल्ल्यात हाके यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे? हल्लेखोर कोण होते? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तर पोलीस देखील या प्रकरणात चौकशी करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 28, 2025 1:36 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Laxman Hake : शरद पवारांवर आरोप, लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ, हाकेंना थेट सलमान खानच्या दर्जाची सुरक्षा!