प्रतीक शिंदेवर गुन्हा दाखल
प्रतीक राम शिंदे (वय 24, रा. भादलवाडी, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील बाळासाहेब होले हे आपल्या क्रेटा गाडीतून प्रवास करत असताना, पाठीमागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या टोयोटा फॉर्च्युनरने (एम.एच. 42 बी.एस. 0111) जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, क्रेटा गाडी पुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर आदळली. त्यामुळे तीनही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.
advertisement
प्रतीक स्वतः गाडी चालवत होता
अवघ्या महिन्याभरापूर्वीच मोठ्या दिमाखात फॉर्च्युनर गाडी खरेदी करणाऱ्या रिल स्टार प्रतीक शिंदेची गाडीच या अपघाताला कारणीभूत ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक स्वतः गाडी चालवत होता. अपघातानंतर परिसरात 'लोकप्रियतेच्या नावाखाली फिल्मी स्टाईलने गाडी चालवणाऱ्यांवर आळा बसलाच पाहिजे', अशा चर्चा सुरू आहेत. या अपघातात लाखो रुपयांचे नुकसान झाले असले, तरी कोणालाही दुखापत झाली नाही, ही बाब दिलासादायक आहे.