माझ्या मम्मीला न्याय मिळवून द्या
माझ्या वडिलांनी आधीपासून खूप कामं केली आहेत. कधी कुठं नाराज केलं नाही. तुम्ही फक्त माझ्या मम्मीला आणि आजीला निवडून आणा, आम्ही नक्कीच चांगलं काम करून दाखवू. तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्या आणि माझ्या मम्मीला न्याय मिळवून द्या, असं वनराज आंदेकरची मुलगी म्हणाली. त्यावेळी ती काहीशी भावूक झाल्याचं देखील पहायला मिळालं. वनराजची मुलगी आपली आई सोनाली आंदेकरच्या प्रचारात दिसली. त्यावेळी तिच्या खांद्यावर राष्ट्रवादीचं उपरणं होतं.
advertisement
नेकी का काम आंदेकर का नाम....
माझ्या वडिलांनी सर्वांना मदत केली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 23 मधून सर्वांचा चांगला सपोर्ट मिळताना दिसतोय, असंही सोनाली आंदेकर आणि वनराज आंदेकरची मुलगी म्हणाली. नेकी का काम आंदेकर का नाम हे उगाच नाहीये. आम्ही प्रभागामध्ये काम करत आहोत. आम्ही आता जनतेच्या कोर्टात गेलोय. त्यामुळेच जनता आम्हाला न्याय देईल, अशी भावना आंदेकर कुटूंबियांनी व्यक्त केली आहे. साम टीव्हीसोबत बोलताना हे वक्तव्य केलं.
16 तारखेला अंतिम सुनावणी
दरम्यान, लक्ष्मी आंदेकर जामीन प्रकरणावर 16 तारखेला अंतिम सुनावणी (फायनल आर्ग्युमेंट) होणार आहे. काल पुणे सत्र न्यायालयात लक्ष्मी आंदेकरच्या जामिनावर सुनावणी झाली. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सुनावणी होणार असल्याने आंदेकरांना मोठा दणका बसला आहे. पोलिसांकडून काही कागदपत्रांची पूर्तता राहिली असल्याने 16 तारखेला अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर सोनाली आंदेकरच्या खंडणी प्रकरणी जामिनासाठी वकील आम्रपाली दीवार काही दिवसात अर्ज करणार आहेत.
आंदेकर कुटूंबाची एकूण संपत्ती किती?
सोनाली आंदेकरच्या प्रतिज्ञापत्रानुसार तिच्याकडे 62,150 रुपये कॅश स्वरुपात आहेत. सोनाली आंदेकरच्या इंडियन बॅकेमध्ये 23 लाख रुपये असल्याची माहिती समोर आलीये. तसेच यूनियन बँकेत 93,740 रुपये एवढंच नाही तर इंडियन बँकेतील आणखी एका खात्यात 10,000 रुपये आहेत. तसेच महेश महिला पतसंस्थेत 5-5 लाखाच्या चार ठेवी आहेत. त्याची किंमत 20 लाख होते. तसेच एक अॅक्टिवा गाडी आहे. सोनालीकडे 3 तोळं सोन्याचं मंगळसुत्र आणि 3 लाथ 93 हजाराच्या बांगड्या आहेत. वनराज असोसिएटस् या फर्ममध्ये दोन लाखाची गुंतवणूक देखील आहे. आंदेकर कुटूंबाची स्थावर मालमत्ता ही 71,71,217 रुपये दाखवण्यात आलीये. त्यामुळे सोनाली आंदेकरच्या कुटूंबाची एकूण मालमत्ता 1, 29,42,957 रुपये असल्याची माहिती समोर प्रतिज्ञापत्रानुसार समोर आली आहे.
