समोर आलेल्या माहितीनुसार, ‘हेराफेरी’, ‘वेलकम’, ‘गोलमाल’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे स्वामित्व हक्क शेमारू कंपनीकडे आहे. कोणतीही परवानगी न घेता या चित्रपटातील काही भागाचे मिम तयार करत येवले अमृतुल्यने आपल्या चहाच्या प्रसिद्धीसाठी वापरल्याचा आरोप आहे. येवले कंपनीने कोणतीही परवानगी न घेता या चित्रपटातील काही भाग सोशल मीडियावर टाकले. कंपनीच्या तक्रारीवरून कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
शेमारु कंपनीचे 50 लाख रुपयांचे नुकसान
शेमारू कंपनीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर शेमारूने येवले कंपनीला जानेवारी महिन्यात नोटीस पाठवून संबंधित चित्रपटांचे स्वामित्व हक्क आपल्याकडे असून मिम तातडीने हटवा, असं सांगितले होते. परंतु तरीही येवले कंपनीने मिम हटवले नाहीत. त्यामुळे शेमारु कंपनीचे 50 लाख रुपयांचे नुकसान झालं, असा दावा शेमारू कंपनीने तक्रारीत केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
विविध कलमांनुसार गुन्हा दाखल
गोलमाल आणि फिर हेराफेरी या चित्रपटांतील काही भाग रिल्स आणि पोस्टर पोस्ट करून सुमारे 50 लाख रुपयांची कमाई केल्याचा शेमारू कंपनीकडून आरोप करण्यात आला आहे. शेमारू कंपनीच्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांकडून कंपनीसह नवनाथ येवले, मंगेश येवले, गणेश येवले, नीलेश येवले व तेजस येवले यांच्याविरुद्ध प्रतिलिपी अधिकार अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.