विवाहित महिलेला 'लग्नाचे आमिष' लागू नाही
आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना, पीडित महिला २९ वर्षांची आणि विवाहित आहे, या वस्तुस्थितीवर जोर दिला. विवाहित व्यक्तीने परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवल्यास, त्यास 'लग्नाचे आमिष' म्हणून गणले जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद अॅड. आतिफ तांबोळी यांनी केला.
या युक्तिवादाला बळ देण्यासाठी, सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निकालाचा संदर्भ देण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या एका पुणेकर तरुणाला जामीन मंजूर करताना स्पष्टपणे म्हटलं होतं की, "जेव्हा महिला आधीच विवाहित आहे, तेव्हा ती असा आरोप करू शकत नाही. लग्नाचं आश्वासन देऊन कोणीतरी तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप ती करू शकत नाही. कारण संबंधित महिलेला पूर्णपणे माहिती असलं पाहिजे की, ती त्या व्यक्तीसोबत विवाह करू शकत नाही."
advertisement
पुण्यातील आयटीच्या तरुणाचा प्रताप; विमानतळावर उघडली बॅग, आत दिसलं असं काही की पोलिसही थक्क
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ
अॅड. तांबोळी यांनी या निकालाचा संदर्भ देत कोर्टासमोर सिद्ध केलं की, हा खटला 'लग्नाच्या आमिषाने बलात्कार' या कलमांतर्गत चालवता येणार नाही. कारण दोन्ही व्यक्तींमध्ये झालेले संबंध हे परस्पर संमतीने होते आणि पीडित महिला विवाहित असल्याने 'लग्नाचे आमिष' हे कारण वैध ठरत नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद स्वीकारत आरोपीला जामीन मंजूर केला. यामुळे, 'लग्नाचे आमिष' दाखवून फसवणूक केल्याच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निर्णयाने महत्त्वाचा कायदेशीर बदल सूचित केला आहे.
