घरात घुसून तरुणीशी अश्लील चाळे
अटकेत असलेल्या आरोपीचे नाव कुणाल सोपान गायकवाड (वय 25, रा. विजया हॉटेलजवळ, बडकीनाला, हडपसर) असं आहे. तो मद्यधुंद अवस्थेत असताना त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भरदिवसा घरात घुसून तरुणीशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पीडित महिला प्रचंड दहशतीखाली होती.
advertisement
तरुणीने आरडाओरडा केला अन्....
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घरात एकटीच असताना आरोपी कुणाल दारूच्या नशेत धुत होऊन तिच्या घरात शिरला. तिथे त्याने तरुणीसोबत अश्लील वर्तन करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तरुणीने आरडाओरडा केला, मात्र तरीही आरोपीने आपले चाळे सुरूच ठेवले होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार
दरम्यान, पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली. या प्रकरणी टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अजमल हा कात्रजमधील संतोषनगर भागातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी अजमला याला अडवले. त्याला शिवीगाळ करून तीक्ष्ण शस्त्राने वार केले.
