TRENDING:

Pune Crime: 'ओव्हरटेक का केलं?' जाब विचारत आधी कढई मग थेट सिमेंटची वीटच डोक्यात घातली, पुण्यात खळबळ

Last Updated:

आरोपींनी संतापाच्या भरात तिथेच असलेल्या चिप्स तळण्याच्या लोखंडी कढईने, हातोडीने आणि सिमेंटच्या विटेने महेंद्र वाघमारे यांच्या डोक्यावर आणि अंगावर गंभीर प्रहार केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात ओव्हरटेक करण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
व्यक्तीवर जीवघेणा हल्ला (AI Image)
व्यक्तीवर जीवघेणा हल्ला (AI Image)
advertisement

नेमकी घटना काय?

सोमवारी (१२ जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वप्निल वाघमारे यांचे वडील महेंद्र वाघमारे हे आपल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी संशयित आरोपींनी त्यांच्या गाडीला 'ओव्हरटेक' केल्याच्या कारणावरून त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना वाटेत अडवले. "तू ओव्हरटेक कसं केलं?" असा जाब विचारत आरोपींनी महेंद्र वाघमारे यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

advertisement

कढई आणि विटेने जीवघेणा हल्ला: वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी संतापाच्या भरात तिथेच असलेल्या चिप्स तळण्याच्या लोखंडी कढईने, हातोडीने आणि सिमेंटच्या विटेने महेंद्र वाघमारे यांच्या डोक्यावर आणि अंगावर गंभीर प्रहार केले. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संक्रातींच्या दिवशी काळाचा घाला, पिंपरीत ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; आईने फोडला हंबरडा

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडीच्या दिवसांत बनवा कुरकुरीत केळीची भजी, चवीला अतिशय टेस्टी, रेसिपीचा Video
सर्व पहा

याप्रकरणी स्वप्निल वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिघी पोलिसांनी दिवाकर सुरेंद्र सिंग, गणेश बांगर, करण मोळक, अमोल गिरी आणि अरशद यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत गणेश बांगर आणि करण मोळक या दोघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत असून, भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे बोपखेल परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: 'ओव्हरटेक का केलं?' जाब विचारत आधी कढई मग थेट सिमेंटची वीटच डोक्यात घातली, पुण्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल