TRENDING:

Pune News : कोयत्याची दहशत आता शाळेपर्यंत पोहोचली! दहावीच्या विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला,परीक्षा केंद्रावर काय घडलं?

Last Updated:

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात दहावीची एसएससी परीक्षा सुरू असताना सकाळी अचानक गोंधळ उडाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune News : सचिन तोडकर, प्रतिनिधी, मंचर/पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दहावीच्या परीक्षा द्यायला गेलेल्या एका 16 वर्षाच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने केला होता. आणि परीक्षा केंद्रातच हा सगळा प्रकार घडला होता. त्यामुळे या घटनेने खळबळ माजली असून विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान या घटनेत विद्यार्थ्यावर हल्ला का करण्यात आला?या हल्ल्यामागचं कारण काय?हे जाणून घेऊयात.
pune crime story
pune crime story
advertisement

जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात पीडीत विद्यार्थी आज पहाटे परीक्ष्या द्यायला गेला होता. दहावीची परीक्षा सुरू असताना सकाळी अचानक गोंधळ उडाला. एक अल्पवयीन मुलगा थेट परीक्षा केंद्राच्या वर्गात घुसला आणि त्याने दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्लेखोराने विद्यार्थ्याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत तो वार हातावर झेलला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पण या घटनेत विद्यार्थी जखमी झाला आहे. या घटनेनंतर परीक्षा केंद्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

advertisement

दरम्यान जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीसह आणखी चार जणांना ताब्यात घेतले. तसेच हल्ल्यासाठी वापरलेला कोयताही पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान हा जुना वाद काय होता, याची माहिती समोर आली नाही आहे.

जखमी विद्यार्थ्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.तसेच या घटनेमुळे परीक्षा केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ओतूर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

ही घटना 16 मार्च 2026 रोजी घटना घडली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावरती 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.या घटनेत 16 वर्षाच्या मुलाच्या डाव्या हाताच्या बोटापाशी जखम झाली आहे.यामध्ये त्याला तीन टाके पडले आहेत.तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्व अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सूरू आहे, अशी माहिती ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune News : कोयत्याची दहशत आता शाळेपर्यंत पोहोचली! दहावीच्या विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला,परीक्षा केंद्रावर काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल