राम शिंदे यांचे सनसनाटी आरोप
रोहित पवारांनीच माझा पराभव करण्यासाठी निलेश घायवळ याचा वापर केला, असं राम शिंदे म्हणाले आहेत. त्यांचं बिनसल्यामुळेच माझ्यावर आरोप केले होते, असं राम शिंदे यांनी रोहित पवारावर आरोप केले आहेत. त्यांच्याबरोबर आले की सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्याबरोबर आले की गुंड असतात का? असा सवाल देखील राम शिंदे यांनी उपस्थित केला. विनासलेलं व्यक्तिमत्व महत्व म्हणजे रोहित पवार, असं म्हणत राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यात जोरदार टीका केली.
advertisement
रोहित पवार यांनीच पासपोर्ट मिळवून दिला
रोहित पवार यांच्या माध्यमातून अनिल देशमुख यांनी मदत केली म्हणून 2020 घायवळला पासपोर्ट मिळाला, त्याची देखील चौकशी सुरू होईल आणि त्यात निष्पन्न होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. काहीतरी हव्यासापोटी चर्चेत राहण्यासाठी मुद्दे काढून टीका करायची रोहित पवारांना सवय आहे. माझ्यासहित चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत यांची नावं घेऊन बदनाम केलं गेलंय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं राम शिंदे म्हणाले आहेत.
जाणीवपूर्वक शिंतोड उडवण्याचा प्रयत्न
माझ्यावर जाणीवपूर्वक शिंतोड उडवण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांच्या आई-वडिलांसोबत निलेश घायवळचे फोटो आहेत. 2020 निलेश घायवळला पासपोर्ट मिळाला होता. घायवळच्या मामाने स्पष्ट सांगितले आहे की, रोहित पवारांनी अनिल देशमुखांच्या माध्यमातून हा पासपोर्ट मिळवून दिला. महाविकास आघाडीच्या काळात घायवळला पासपोर्ट दिला होता, असंही राम शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीचे आदेश दिले आहेत, असंही राम शिंदे म्हणाले.