पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं
पुण्यातील बावधन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले असून त्यातूनही अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. याप्रकरणी हगवणे कुटुंबातील 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बावधन पोलिसांनी पती शशांक सह दोन महिलांना ताब्यात घेतलं होतं. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे अद्याप फरार असल्याची माहिती मिळतीये. या प्रकरणातील मयत वैष्णवी हगवणे यांचा शव विच्छेदन अहवाल समोर आला असून या आत्महत्या आणि घातपात अश्या दोन्ही शक्यता वर्तविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
advertisement
हुंड्यासाठी मानसिक छळ
बावधन पोलिसांत वैष्णवी हगवणे यांच्या वडीलांनी फिर्याद दिली होती. हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करत तिची मारहाण करत तिला क्रूरतेची वागणूक देत असल्याचे फिर्यादीत म्हटलं असून या प्रकरणाचा तपास बावधन पोलिस करत आहेत.
दरम्यान, राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
