नेमकी घटना काय?
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर अकबर हाश्मी (वय २५, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) असे आहे. फिर्यादी तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, आरोपी समीर हा गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने अनेकदा तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता.
पुण्यात कढीपत्त्यावरून राडा! 5-6 जणांच्या टोळक्याचं तरुणासोबत भररस्त्यात धक्कादायक कृत्य
advertisement
मारहाण आणि विनयभंग: पीडित तरुणीने आरोपीच्या मागणीला प्रतिसाद न दिल्याने, संतापलेल्या समीरने तिला अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने तिला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने तातडीने पालकांसह लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि आरोपी समीर हाश्मीला अटक केली. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मात्र, भरदिवसा रस्त्यात घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
