आमिष दाखवून जाळ्यात ओढले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक १० नोव्हेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ या दीड महिन्याच्या कालावधीत करण्यात आली. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून, त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला विश्वास संपादन केल्यानंतर, चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास प्रवृत्त केले.
advertisement
Pune Crime: घरफोडी नाही तर बनावट चावीनं साधला डाव; पुण्यातील अजब चोरीच्या घटनेनं सगळ्यांना फुटला घाम
परतावा तर मिळालाच नाही, मुद्दलही गेली
चोरट्यांच्या भूलथापांना बळी पडून तक्रारदाराने वेळोवेळी एकूण ५३ लाख ८७ हजार रुपये गुंतवले. मात्र, जेव्हा त्यांनी नफ्यासह रक्कम परत मागितली, तेव्हा चोरट्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस तपास आणि खबरदारी
सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरू केला असून, ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले आहेत, त्यांचा तपशील मिळवला जात आहे. शेअर बाजाराच्या नावाखाली टेलिग्राम किंवा व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे दिल्या जाणाऱ्या गुंतवणुकीच्या सल्ल्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
