TRENDING:

Pune Crime : 'चल आपण पहिला नंबर ठरवू...', विद्येच्या मंदिरातच शिक्षकाचे अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य!

Last Updated:

Pune daund crime teacher molestation : दुपारी 1 वाजताच्या सुमारास जेव्हा विद्यार्थिनी प्रदर्शनाच्या कामात व्यस्त होत्या, तेव्हा या शिक्षकाने मुलीचा हात धरून तिला जवळ बसवले आणि स्पर्धेचे निकाल ठरवण्याच्या बहाण्याने लज्जास्पद कृत्य केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pune Daund Crime News : शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो, जो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया रचतो. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा 'ज्ञानदीप' म्हणून शिक्षकाकडे पाहिलं जातं. जेव्हा समाजात अशा पवित्र नात्याला गालबोट लावणाऱ्या घटना घडतात. अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून गुरुवारी एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शालेय शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकानेच गैरवर्तन केल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Pune daund crime teacher molestation
Pune daund crime teacher molestation
advertisement

शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

पारगाव येथील एका शाळेत 18 डिसेंबर रोजी प्रदर्शनाची तयारी सुरू असताना हा सर्व प्रकार घडला. येथील 13 वर्षांच्या एका विद्यार्थिनीचा शाळेतील शिक्षकाने विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी प्रशांतकुमार हरिचंद्र गावडे (रा. पारगाव) नावाच्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दोघे मिळून स्पर्धेचे नंबर ठरवू

advertisement

दुपारी 1 वाजताच्या सुमारास जेव्हा विद्यार्थिनी प्रदर्शनाच्या कामात व्यस्त होत्या, तेव्हा या शिक्षकाने मुलीचा हात धरून तिला जवळ बसवले आणि स्पर्धेचे निकाल ठरवण्याच्या बहाण्याने लज्जास्पद कृत्य केले. काही विद्यार्थिनी शाळेतील प्रदर्शनाच्या तयारीत व्यग्र होत्या. त्या वेळी शिक्षकाने विद्यार्थिनीचा हात धरून 'आपण दोघे मिळून स्पर्धेचे नंबर ठरवू' असे म्हणून तिच्या शेजारील बाकावर बसला. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीचा विनयभंग केला.

advertisement

शिक्षकावर तातडीने गुन्हा नोंदवला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
20 गुंठ्यात 4 लाख! मराठवाड्यातील शेतकऱ्याला सापडला यशाचा फॉर्म्युला, काय केलं?
सर्व पहा

या घटनेमुळे घाबरलेल्या पीडित मुलीने तत्काळ घरी जाऊन आपल्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी रात्री उशिरा यवत पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिक्षकावर तातडीने गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे कृत्य केल्याने शिक्षण क्षेत्रातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : 'चल आपण पहिला नंबर ठरवू...', विद्येच्या मंदिरातच शिक्षकाचे अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल