भरधाव कारची जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद दिलीप मिसाळ हा २६ वर्षीय तरुण डिलिव्हरी बॉय (Delivery boy) म्हणून काम करतो. तो आपली ड्युटी करत असताना चांदणी चौक परिसरात एक ऑर्डर आली, त्यामुळे त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. मात्र, त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तो खाली पडल्यानंतर कारचे चाक थेट त्याच्या छातीवरून गेले, ज्यामध्ये त्याच्या बरगड्या फॅक्चर झाल्या आहेत.
advertisement
पाहा Video
डिलिव्हरी बॉयचा प्रकृती चिंताजनक
या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कार चालकाचे नाव तेजस बाबुलाल चौधरी असे आहे. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन केल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित केले आहे. सध्या जखमी प्रसादवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपीवर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
