रुग्णालयात दाखल करताना गायत्री कोमात होती. सीटी स्कॅन तपासणीत तिच्या कवटीला फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले. सुदैवाने या दुखापतीमुळे मेंदूवर गंभीर दाब निर्माण झाला नव्हता. मात्र, तिच्या मेंदूतील रक्तस्रावामुळे प्रकृती चिंताजनक होती. तिला बाल अतिदक्षता विभाग (PICU) मध्ये दाखल करण्यात आले आणि डॉ. मिलिंद जंबगी, डॉ. शिजी चालीपट आणि न्यूरोसर्जन डॉ. अभिजीत घंगाळे यांच्या देखरेखीखाली 24 तास ठेवण्यात आले.
advertisement
Vat Purnima: मृत्यूच्या दारातून तिने पतीला खेचून आणलं, भाग्यश्रीने जे केलं ते कुणीच करणार नाही!
गायत्रीच्या मेंदूवरील दाब कमी करण्यासाठी आणि रक्ताची गाठ काढण्यासाठी तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. घंगाळे यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया सुमारे एक तास चालली आणि तिच्या मेंदूने चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे तिची प्रकृती स्थिर झाली आणि काही दिवसांनंतर तिला घरी सोडण्यात आले.
डॉ. जंबगी म्हणाले की, “प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. वेळेत निदान व उपचार मिळाल्यामुळे आज गायत्रीचे आयुष्य वाचले.” पालकांना सूचना दिली की, “अपघातानंतर बेशुद्धावस्था, उलटी, रक्तस्त्राव, फिट्स यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.” ही संपूर्ण घटना अत्यंत धक्कादायक होती. अंकुरा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वेळेवर योग्य उपचार करून मुलीला नवे आयुष्य दिले. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.





