Vat Purnima: मृत्यूच्या दारातून तिने पतीला खेचून आणलं, भाग्यश्रीने जे केलं ते कुणीच करणार नाही!

Last Updated:

Vat Purnima 2025: वटसावित्रीच्या दिवशी मृत्यूच्या दारातून सावित्रीने पतीला वाचवल्याची कथा सांगितली जाते. सोलापुरातील आधुनिक सावित्रीने पतीसाठी जे केलं, ते पाहून सगळीकडे कौतुक होतंय.

+
Vat

Vat Purnima: मृत्यूच्या दारातून तिने पतीला खेचून आणलं, भाग्यश्रीने जे केलं ते कुणीच करणार नाही!

सोलापूर - 'सावित्रीने पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत आणले होते,' ही वटसावित्रीची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु, अशीच काहीशी घटना सोलापुरात घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील एका आधुनिक सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिले आहे. दोन्ही किडन्या निकामी झालेल्या पतीला पत्नी भाग्यश्री शिवाजी तुरबे यांनी किडनी दान केली आणि यमाच्या दारातून त्यांना परत आणले.
advertisement
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे गावात राहणारे शिवाजी तुरबे यांच्याशी 15 वर्षांपूर्वी भाग्यश्री यांचा विवाह झाला आहे. हसत-खेळत दोघेजण मिळून संसाराचा गाडा हाकत होते. काही दिवसांनंतर शिवाजी तुरबे हे नेहमी आजारी पडत होते. उलट्या होणे, पायाला सूज येणे, मळमळणे असे प्रकार सुरू होते. त्यामुळे त्यांना सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
advertisement
सोलापुरातील एका रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या किडनीवर सूज आल्याचे सांगितले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना दोन्ही किडन्या निकामी झाल्या. घरातील कर्त्या पुरुषाला असे झाल्याचे कळताच कुटुंबातील सर्वांना धक्का बसला. तर दुसरीकडे दिवसेंदिवस शिवाजी यांची प्रकृती खालावत चाललेली होती.
advertisement
पत्नीने दिली किडनी
शिवाजी तुरबे यांना दुसऱ्या किडनीची आवश्यकता होती. तर डॉक्टरांनी दुसरी किडनी मिळणे अशक्य असल्याचे सांगितले. तेव्हा शिवाजी यांची पत्नी भाग्यश्री यांनी आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केली तेव्हा भाग्यश्री यांचा रक्तगट 'ओ पॉझिटिव्ह' निघाला आणि ती किडनी शिवाजी यांना चालणार असे सांगितले.
सोलापूर शहरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. माझ्या पत्नीने मला किडनी देऊन मला नवीन जीवनदान दिल्याचे शिवाजी तुरबे सांगतात. पतीला किडनी देणाऱ्या पत्नी भाग्यश्री तुरबे यांचे भंडारकवठे गावासह सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Vat Purnima: मृत्यूच्या दारातून तिने पतीला खेचून आणलं, भाग्यश्रीने जे केलं ते कुणीच करणार नाही!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement