TRENDING:

Pune Drugs Party Case : FC रोड ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 'त्या' 2 तरुणांची नावे समोर

Last Updated:

Pune Drugs Party Case : पुण्यातील एफसी कॉलेज रस्त्यावरील लिक्विड लिझर लाउंज L3 बार हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, (वैभव सोनवणे, प्रतिनिधी) : पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असतानाच पुण्यात ड्रग्ज केसने खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या शनिवारी फर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या लिक्विड लिझर लाउंज (L3) बार हॉटेलमध्ये पार्टी रंगली होती. या पार्टीत ड्रग्ज घेतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील 6 जणांना अटक केलीय. पार्टीमध्ये अमली पदार्थाचं सेवन करणार्‍या दोघांचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी एका पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यात पुन्हा ड्रग्ज पार्टी? हॉटेलमध्ये रात्री नेमकं काय झालं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
पुण्यात पुन्हा ड्रग्ज पार्टी? हॉटेलमध्ये रात्री नेमकं काय झालं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
advertisement

त्या दोन्ही तरुणांची ओळख समोर

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड पुणे येथील लिक्विड लिझर लाउंज (L3) या ठिकाणी ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप ठेवत 2 तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात आहे. नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा अशी दोन्ही तरुणांची नावे आहेत. यापैकी एकाला मुंबईतून तर दुसऱ्याला पुण्यातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहेत. काहीच वेळात या दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत.

advertisement

लिक्विड लिझर लाउंज (L3) या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसंच हॉटेल रेनबोचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं लिक्विड लिझर लाउंज (L3) या हॉटेलची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना मद्यसाठा आढळून आला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करून एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये एकूण 241 लिटर विदेशी मद्य आणि इतर साहित्य असा एकूण 3 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

advertisement

वाचा - porsche कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला सोडा, कोर्टाचे पुणे पोलिसांना आदेश

पोलिसांकडून कारवाई

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांद्याचे दर पुन्हा कोसळले, लिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

पालिकेकडून ड्रग्स सापडलेल्या लिक्विड लिझर लाउंज (L3) बांधकामाची आतून पाहून केली जात आहे. जर समजा पालिकेला बारच्या आत काही अनधिकृत बांधकाम आढळून आलं तर ते पाडलं जाऊ शकते. पण पब मालक विठ्ठल कामटे यांनी पालिकेच्या अनधिकृत विभागाची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Pune Drugs Party Case : FC रोड ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 'त्या' 2 तरुणांची नावे समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल