गणपतीला मोदकाचा नैवेद्य सगळेच दाखवतात. या मंडळांनी विद्येची देवता असलेल्या विद्याधीशाला पुस्तकांचा नैवेद्य दाखवलाय. त्यांनी तब्बल 5 हजार पुस्तकांचा नैवेद्य दाखवलाय.
‘जय गणेश व्यासपीठ’ कडून हा उपक्रम राबवला जातोय. येत्या काही दिवसांमध्ये पुस्तकांची संख्या 25 हजारांपर्यंत नेण्याचा त्यांचा संकल्प आहे.साईनाथ मंडळ बुधवार पेठ, सेवा मित्र मंडळ, नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट, शनी मारुती बाल गणेश मंडळ एरंडवणा, एकता मित्र मंडळ अरण्येश्वर, वीर शिवराज मंडळ गुरुवार पेठ , श्री शिवाजी मंडळ भवानी पेठ, अखिल कापडगंज मित्र मंडळ, अखिल रामनगर मंडळ येरवडा, पोटसुळ्या मारुती मंडळ या मंडळांचा यामध्ये समावेश आहे.गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवण्यात आलेली सर्व पुस्तकं पुणे जिल्ह्यातल्या वेल्हा, मुळशी, भोर या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी देण्यात येणार आहेत.
advertisement
बाप्पाच्या ओढीनं थायलंडचं कुटुंब पुण्यात, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर म्हणाले...
पुस्तके ही ज्ञानात भर टाकणारे खरे मित्र असतात आणि विद्यार्थ्यांनी मोबाईलशी असलेली मैत्री जपत पुस्तकांशीही मैत्री करावी या उद्देशाने ' पुस्तकपेठ ' या महानेवैद्याचा उपक्रम आहे, अशी माहिती या उपक्रमाचे आयोजक पियूष शहा यांनी दिली.
129 वर्ष जुन्या गणेशोत्सवास कल्याणमध्ये थाटात सुरूवात, लोकमान्य टिळकांशी आहे जवळचा संबंध
बालसाहित्य,परिकथा, जदुकथा, प्रेरणादायी,चरित्र,क्रांतिकारी, भारतरत्न,चरित्र, चांद्रयान विशेष अशा सामाजिक विषयावर माहिती देणारे पुस्तकांचा या नैवेद्यामध्ये समावेश करण्यात आलाय. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होईल अशी आशा शहा यांनी व्यक्त केलीय.