अहवालानंतर पोलिसांची कारवाई
विसर्जन मिरवणुकीदरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (MPCB) आणि पुणे पोलिसांच्या पथकांनी सहभागी मंडळांच्या ध्वनिक्षेपक यंत्रांची तपासणी केली होती. या तपासणीचे अहवाल नुकतेच पोलिसांना प्राप्त झाले आहेत. या अहवालानुसार, अनेक मंडळांनी उच्च क्षमतेचे ध्वनिक्षेपक आणि प्रखर प्रकाशझोत वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस आयुक्तांनी आधी आवाहन करूनही या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
advertisement
श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे अनेक आजारांवर मोफत शस्त्रक्रिया, जाणून घ्या योजना!
अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित मंडळांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. नोटीस मिळालेल्या मंडळांना सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंडळांना सादर करायची कागदपत्रं :
मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं लेखी म्हणणं, परवानगी पत्र, विसर्जन सोहळ्यात ध्वनिक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून देणाऱ्या व्यावसायिकाचं नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, मिरवणूक परवाना अशा कागदपत्रांसह संबंधित परिमंडळाच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात उपस्थित राहाण्यास सांगण्यात आलं आहे.
नोटिशीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, जर संबंधित मंडळाचे पदाधिकारी निर्धारित वेळेत परिमंडळाच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत किंवा स्पष्टीकरण दिले नाही, तर मंडळाचं काहीही म्हणणं नसल्याचं समजलं जाईल. त्यानंतर, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 136 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 15 नुसार त्या मंडळांवर थेट गुन्हा दाखल करण्याची कठोर कारवाई केली जाईल.
