TRENDING:

पुणे हादरलं! निलंबनाचा राग मनात, कर्मचाऱ्याने पत्नीसह मिळून अधिकाऱ्याला रस्त्यात गाठलं अन्...

Last Updated:

त्यांच्या कार्यकाळात एका कनिष्ठ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याच कारवाईचा राग संबंधित कर्मचाऱ्याच्या मनात होता

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पुणे शहरात एका सरकारी अधिकाऱ्यावर निलंबनाच्या रागातून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्वी केलेल्या प्रशासकीय कारवाईचा सूड उगवण्यासाठी एका निलंबित कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह मिळून पंचायत समितीच्या वरिष्ठ सहाय्यकास भररस्त्यात बेदम मारहाण केली.
अधिकाऱ्याला भररस्त्यात बेदम मारहाण (AI Image)
अधिकाऱ्याला भररस्त्यात बेदम मारहाण (AI Image)
advertisement

निलंबनाचा जुना राग: फिर्यादी अधिकारी सध्या हवेली पंचायत समितीमध्ये वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत होते. यावेळी त्यांच्या कार्यकाळात एका कनिष्ठ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याच कारवाईचा राग संबंधित कर्मचाऱ्याच्या मनात होता. शुक्रवारी (९ जानेवारी) दुपारी जेव्हा फिर्यादी अधिकारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरून जात होते, तेव्हा आरोपी कर्मचारी आणि त्याच्या पत्नीने त्यांना रस्त्यात गाठलं.

advertisement

Pune Accident: गिरणीत घाम गाळला, मुलींना शिकवलं; पण काळाचा घाला पडला अन् शिंदे कुटुंबाचा आधारच हरपला

आरोपी दाम्पत्याने अधिकाऱ्याला अडवून सुरुवातीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भररस्त्यात सरकारी अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर पीडित अधिकाऱ्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चॉकलेट बोबा ते तिरंगा सँडविच, फक्त 99 रुपयांत हटके स्वाद, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी संबंधित कर्मचारी आणि त्याच्या पत्नीविरोधात 'शासकीय कामात अडथळा' (कलम ३५३) आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. प्रशासकीय कारणावरून थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर हात टाकण्याच्या या प्रवृत्तीमुळे सरकारी कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! निलंबनाचा राग मनात, कर्मचाऱ्याने पत्नीसह मिळून अधिकाऱ्याला रस्त्यात गाठलं अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल