हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकात हा कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काळेपडळ (प्रभाग क्र. ४१) येथील एका इच्छुक कार्यकर्त्याने नागरिकांसाठी या कीर्तनाचं आयोजन केलं होतं. रस्त्याच्या मधोमध कार्यक्रम असल्याने, श्रीराम चौक ते हडपसर दरम्यानच्या रस्त्यावर वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी झाली.
'लग्नाला का आला नाही?' पिंपरीत क्षुल्लक कारणावरून तरुणासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसही चक्रावले
advertisement
या वाहतूक कोंडीमुळे नागरिक संतप्त झाले. अखेरीस, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी त्यांनी थेट कीर्तन सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन महाराजांना उद्देशून "महाराज, कार्यक्रम बंद करा" असं सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आयोजकांना कार्यक्रम काही काळासाठी थांबवावा लागला. पोलिसांनी वाहतूक थांबलेला रस्ता मोकळा करून घेतल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाली.
आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे वाहतुकीचा रस्ता अडवून कार्यक्रम केल्याने हजारो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करणं भाग पडलं.
