तातडीने तपासणी मोहीम
शाळेच्या ई-मेलवर ही धमकी मिळताच व्यवस्थापनाने तात्काळ हिंजवडी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता शाळेत धाव घेतली. तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे ३५० विद्यार्थी असलेल्या या शाळेला तातडीने सुट्टी देऊन परिसर रिकामा करण्यात आला.
advertisement
अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा शाळेत पाहून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस आणि तपास पथकाने सुमारे दोन तास संपूर्ण शाळेची कसून तपासणी केली. मात्र, तपासणीदरम्यान शाळेच्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्बसदृश साहित्य आढळले नाही.
Pune News: स्वत:च्या जमिनीवरील झाड तोडताय? मग हे वाचाच, होईल 50 हजाराचा दंड
ई-मेल खोटा असल्याचे निष्पन्न
तपासानंतर हा ई-मेल खोटा असल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी माहिती दिली की, "प्राथमिक तपासानंतर ई-मेल खोटा असला, तरी शाळेला हा ई-मेल कोठून पाठवला गेला आणि त्यामागील उद्देश काय होता, याची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. अफवा पसरवणाऱ्यांवर योग्य कारवाई केली जाईल."
