Pune News: स्वत:च्या जमिनीवरील झाड तोडताय? मग हे वाचाच, होईल 50 हजाराचा दंड

Last Updated:

नागरिकांनी आपल्या स्वत:च्या जमिनीवरील झाडे तोडण्यासाठीही पालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे, मात्र अनेक नागरिकांकडून या नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

विनापरवाना झाड तोडल्यास दंड
विनापरवाना झाड तोडल्यास दंड
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) शहरात होणाऱ्या विनापरवाना वृक्षतोडीला (Illegal Tree Felling) आळा घालण्यासाठी कठोर झाली आहे. अनधिकृतपणे झाड तोडणाऱ्यांवर आता तब्बल ५० हजार रुपयांचा दंड (Penalty) आकारण्याची तरतूद मनपाने केली आहे. नागरिकांनी आपल्या स्वत:च्या जमिनीवरील झाडे तोडण्यासाठीही पालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे, मात्र अनेक नागरिकांकडून या नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
परवानगी घेण्याची प्रक्रिया
शहरातील हरित क्षेत्राचे संरक्षण करणे आणि वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवणे यासाठी पालिकेने हे कठोर पाऊल उचलले आहे. आपल्या प्लॉट, शेत, घर किंवा बंगल्याच्या परिसरात असलेले कोणतेही झाड तोडण्यापूर्वी नागरिकांनी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे रीतसर अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत झाडाचे फोटो, झाडाचा अहवाल आणि ते का तोडायचे आहे, याचे सविस्तर कारण नमूद करून मंजुरी घ्यावी लागते.
advertisement
रात्रीच्या वेळी वृक्षतोडीवर लक्ष
अनेक ठिकाणी बांधकाम व्यावसायिक, भूखंड मालक किंवा शेतकरी परवानगी न घेता झाडतोड करत असल्याच्या तक्रारी मनपाकडे येत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा सुट्ट्यांच्या दिवशी अशा प्रकारे नियमबाह्य वृक्षतोड केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पालिकेचे पथक आता अचानक तपासणी मोहीम राबवणार आहे.
advertisement
कठोर कायद्यामागील उद्देश
शहरातील झपाट्याने घटणारे झाडांचे प्रमाण रोखणे, अनियमित बांधकामांमुळे वाढणारा तापमानाचा ताण कमी करणे, पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता जपण्याचे उद्दिष्ट ठेवून मनपाने हा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पर्यावरणाबद्दल जबाबदार राहावे, यासाठी हे कठोर नियंत्रण आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: स्वत:च्या जमिनीवरील झाड तोडताय? मग हे वाचाच, होईल 50 हजाराचा दंड
Next Article
advertisement
BJP Shiv Sena Shinde : डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?
डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?
  • डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?

  • डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?

  • डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?

View All
advertisement