BJP Shiv Sena Shinde : डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?

Last Updated:

Eknath Shinde BJP : डोंबिवलीत शिंदे गटातील दोन प्रभावी स्थानिक नेत्यांना आपल्या गळाला लावत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंची कोंडी केली आहे.

डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?
डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?
ठाणे: महायुतीतील अंतर्गत तणाव शमवण्याच्या उद्देशाने दिल्लीहून 'इनकमिंग बंदी'चा संदेश घेऊन परतलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपकडून पुन्हा धक्का बसला आहे. डोंबिवलीत शिंदे गटातील दोन प्रभावी स्थानिक नेत्यांना आपल्या गळाला लावत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदेंची कोंडी केली आहे.
बुधवारी झालेल्या या पक्ष प्रवेशात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख विकास देसले आणि शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ यांचे पुत्र अभिजीत थरवळ यांनी शिंदेंची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले.

चव्हाण यांच्याकडून इनकमिंग सुरुच...

गेल्या काही महिन्यांपासून चव्हाण हे कल्याण-डोंबिवली पट्ट्यात शिंदे समर्थकांना लक्ष्य करत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांना भाजपमध्ये आणले होते. त्यानंतर शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे महेश पाटील आणि तिघे नगरसेवकही चव्हाण यांच्या प्रयत्नांतून भाजपकडे वळले. या सलग फोडाफोडीमुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती.
advertisement
याच असंतोषाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील काही मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र त्या वेळी फडणवीस यांनी 'सुरुवात तुमच्याकडून झाली' अशा शब्दांत उलट शिंदे गटालाच सुनावले होते. त्यानंतर स्वतः शिंदे दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आले. भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीमुळेच ही भेट घडल्याचे राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा होती.
advertisement

भाजपकडून धक्कातंत्र सुरुच...

नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर शिंदे गट आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे अनेक प्रसंग दिसले. तळकोकणासह इतर काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
अशातच आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी डोंबिवलीत घडलेल्या घडामोडीमुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे दिसून आले. विकास देसले आणि अभिजीत थरवळ या दोन प्रभावी शिंदे गट नेत्यांनी चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली.
advertisement

आरोप-प्रत्यारोपांचे बाण...

शिंदे गटाचे महेश पाटील पक्षात दाखल झाल्यानंतर भाजपने मलंगगड, २७ गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. शिंदे गट आमदार राजेश मोरे आणि शहरप्रमुख राजेश कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन थेट चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. मात्र, या पत्रकार परिषदेच्या अवघ्या तासाभरातच शिंदे गटाचे नेते सदानंद थरवळ यांचे सुपुत्र अभिजीत थरवळ यांचाही भाजपात प्रवेश देण्यात आला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Shiv Sena Shinde : डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?
Next Article
advertisement
BJP Shiv Sena Shinde : डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?
डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?
  • डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?

  • डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?

  • डोंबिवलीत शिंदेंना डबल झटका! दोन बडे नेते भाजपात, चव्हाणांचा ‘गेमप्लॅन’ यशस्वी?

View All
advertisement