पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात असणाऱ्या टेकडीवर महादेवाचे मंदिर आहे आणि आजूबाजूला निसर्गरम्य असं वातावरण आहे. याच ठिकाणी अनेक कुत्री देखील राहतात. त्याच परिसरात राहणारे सुनिल तिकोणे हे रोज टेकडीवर जाऊन शंख वादन करतात. परंतु त्यांनी शंख वादन केल्यानंतर कुत्री देखील त्याच पद्धतीने साद देतात. तुम्ही म्हणालं हे कसं तर ते गेली 6 वर्ष झालं तिथे रोज जातात. त्यावेळी ती कुत्री देखील जमून त्यांच्या जवळ बसतात. पण या कुत्र्यांना ही सवय कशी लागली? आणि कुत्री कशा पद्धतीने साथ देतात याविषयीच सुनिल तिकोणे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कुत्र्यांना सवय कशी लागली?
येरवड्यातील सुप्रसिद्ध असं शिवकालीन मंदिर आहे. तिथे जवळ असलेल्या टेकडीवर गेली 30 वर्ष झालं व्यायाम करण्यासाठी जात आहे. गेली 6 वर्ष झालं तिथे शंख वाजवायला सुरुवात केली. काही लहान कुत्री तिथे येऊन बसायची एकदिवस अचानक पणे त्यांनी माझ्या सोबत सूर काढण्यास सुरुवात केली. मी आश्चर्य चकित झालो आणि कळून चुकलं की हे मला साथ देतायत. जेव्हा जेव्हा मी शंख वाजवायला यायचो तेव्हा तेव्हा हे माझ्या जवळ येऊन मला साथ देतात, असं सुनिल तिकोणे सांगतात.
शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावे यासाठी सरसावले पर्यावरण योद्धे, तब्बल 2 लाख वृक्षांची केली लागवड Video
प्रथम कुत्री व्यायाम करताना शांतपणे शेजारी बसायचे. व्यायाम करताना शंख थांबून थांबून वाजवत होतो. अचानक पणे याच्या मधील एक कुत्रा शंख वाजवत असताना आवाज द्यायला लागला. त्यानंतर बाकीचे चार पाच कुत्री सुद्धा साथ देऊ लागले. ही सर्व कुत्री आम्ही व्यायाम करायला जातो. तेव्हा सुद्धा खुप आंनदीत होतात. संध्याकाळी महादेवाची आरती असते. त्यावेळी सुध्दा हे कुत्री मी शंख वाजल्यास पळत येतात आणि माझ्या बरोबर शंखा सारखा सूर लावतात,असं सुनिल तिकोणे सांगतात.
तब्बल 70 वर्ष जुनं ऐतिहासिक असं हनुमानाचं मंदिर, दिवसेंदिवस वाढते मूर्ती, कुठे आहे हे ठिकाण?
इतर वेळी चुकूनही हे माझे मित्र असा आवाज काढत नाहीत. माझ्या शिवाय अजून एक व्यक्ती आहे त्यानी सुद्धा शंख वाजवला तर हे सूर लावतात पण मला लांबूनच बघितलं तरी खुप आंनदीत होतात. ही सर्व कुत्री लहानपणापासून डोंगरावर राहतात. अनिता आगरवाल ह्या त्या सर्व लाडक्या प्राण्यांची देखभाल करतात. जेवण, दवाखान्याचा खर्च करतात. त्याचा ह्या प्राण्यावर खुप जीव आहे. येरवडा परीसरातील जवळपास शंभर कुत्री, मांजरी यांची त्या काळजी घेतात, अशीही माहिती सुनिल तिकोणे यांनी दिली आहे.