सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं?
या घटनेची अधिक माहिती अशी की, हातात एक पिशवी घेऊन एक व्यक्ती भर दुपारी एका जुन्या बंद घराच्या दारात आला. त्याच्यासोबत चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेली एक महिला देखील होती. या दोघांनी घराच्या दारात थांबून विधी करण्यास सुरुवात केली:
प्रथम त्यांनी दारात दही आणि भात ठेवला. त्यावर हळद-कुंकू लावले. यानंतर त्यांनी लिंबू ठेवले आणि नारळ फोडले. जादूटोण्याच्या विधीनंतर ते दोघेही तातडीने घटनास्थळावरून निघून गेले.
advertisement
'मुंबईहून आलोय' सांगून काढता पाय
हा प्रकार सुरू असताना परिसरातील काही नागरिकांनी त्या पुरुषाला विचारपूस केली. चौकशी करणाऱ्या लोकांना त्याने "आम्ही मुंबईहून आलो आहोत" असे अस्पष्ट उत्तर दिले आणि कोणत्याही प्रश्नाची माहिती न देता तो त्वरित तिथून निघून गेला. त्याने नेमक्या कोणत्या कारणास्तव हे कृत्य केले किंवा कोणाच्या सांगण्यावरून हा विधी केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
महिलेला वेदना असह्य पण डॉक्टर गाढ झोपेत; जगात येण्याआधीच बाळाचा करुण अंत, पुण्यातील घटनेनं खळबळ
स्थानिक नागरिकांच्या मते, ज्या बंद घरासमोर हा जादूटोणा करण्यात आला, त्या घरासंबंधी मालमत्तेचा मोठा वाद सुरू आहे. या वादामुळेच, विरोधी पक्षावर दडपण आणण्यासाठी किंवा त्यांना घाबरवण्यासाठी हा जादूटोणा करण्यात आला असावा, असा तीव्र संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कडुस गावातील नागरिक भयभीत झाले असून, अंधश्रद्धा आणि दहशतीची छाया पसरली आहे. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजसह असलेला व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
